Viresh Borkar  Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly: ...तर दरडी कोसळल्या नसत्या!

Viresh Borkar: गोवा‌ हा पश्चिम घाटाचा भाग असल्याने राज्याला जास्त काळजी घ्यावी लागणार आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: माधव गाडगीळ अहवालातील शिफारशी लागू केल्या असत्या तर दरडी कोसळल्या नसत्या. गोवा‌ हा पश्चिम घाटाचा भाग असल्याने राज्याला जास्त काळजी घ्यावी लागणार आहे, असे आमदार वीरेश बोरकर यांनी आज विधानसभेत सांगितले.

गावकर म्हणाले, धारबांदोड्यात सर्वाधिक पाऊस पडतो. सरकारी यंत्रणेकडे मात्र त्याची नोंद नसते. पणजीत पडणाऱ्या पावसाच्या आधारे ते आपले आडाखे बांधतात. धारबांदोडा तालुक्यात अशा संकटांची पूर्वकल्पना देणारे यंत्रणा सरकारने उभारणे आवश्यक आहे.

बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगस म्हणाले, डोंगर कापण्यासाठी आता नवी शक्कल लढवली जात आहे. कोणीतरी तो डोंगर कमकुवत झाला, अशी तक्रार करतो. मग पायऱ्या पायऱ्याने तो कापून स्थिर करतो. हळूहळू तो डोंगर कोसळून जातो. डोंगर न कापता हॉटेले, घरे बांधता येणार नाहीत का, याचा विचार व्हावा.

फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई म्हणाले,२०११ पण ते माधव गाडगीळ यांनी वायनाड येथे अशी दुर्घटना घडू शकते, अशी शक्यता वर्तवली होती. त्याकडे दुर्लक्ष झाल्याने आज २७६ जणांनी जीव गमावला आहे. केरळमधील कॉंग्रेस आणि डाव्यांच्या सरकारने गाडगीळ अहवाल नाकारला, कर्नाटकानेही नाकारला.

यंदा त्या भागात ७० टक्के पाऊस जास्त झाला आहे, ही वस्तुस्थिती आहे. गोव्यातील दरड प्रवण क्षेत्राचा अभ्यासही सरकारने करून घेतला आहे, तो अहवाल सरकारने सादर करावा, त्यावर चर्चा करावी आणि ठोस उपायोजनाही करावी.

केप्याचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी पूर्वी डोंगरावरून पुराचे पाणी गावात शिरत होते. मात्र, आता चिखल मिश्रित पाणी गावात शिरते याकडे लक्ष वेधले.

अभ्यासाअंती उपाययोजना; मोन्सेरात

महसूलमंत्री ‌बाबूश मोन्सेरात यांनी दरडी प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी सर्व खात्यांच्या समन्वयाने आपत्ती व्यवस्थापन काम करेल असे नमूद केले. ते म्हणाले, दरड प्रवण क्षेत्राचा अभ्यास केला जाणार आहे. यापूर्वी केलेल्या शिफारशी आणि आताची गरज याची सांगड घालून उपाययोजना केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Upcoming Phones: Realme, OnePlus... 'या' आठवड्यात लॉन्च होणार 'हे' जबरदस्त स्मार्टफोन; फीचर्स एकदा पाहाच…

गोमंतकीय जोडप्याने मणिपूरात उभारले प्रार्थनास्थळ; मुनपी गावात पहिल्यावहिल्या 'सेंट जोसेफ चर्च'चे लोकार्पण!

ENG vs NZ 1st ODI: इंग्लंडच्या हॅरी ब्रूकचा महाविक्रम! 32 वर्षांपूर्वीचा रॉबिन स्मिथचा मोडला रेकॉर्ड; एकाकी लढत देऊन ठोकले 'दमदार शतक' VIDEO

Gold Rate Today: सोनं झालं स्वस्त... 4 दिवसांत 7,000 रुपयांची घसरण, 10 ग्रॅम 24 कॅरेटचा नवीन भाव जाणून घ्या

Donald Trump Dance: मलेशियात उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका! सोशल मीडियावर 'तो' भन्नाट डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल; तुम्ही पाहिलाय का? VIDEO

SCROLL FOR NEXT