Jit Arolkar Dainik Gomantak
गोवा

कलाकारांची दखल घेणे हाच खरा सन्मान : जीत आरोलकर

पूर्वी कलाकारांनी मेहनत घेऊन कसल्याच प्रकारच्या मानधनाची अपेक्षा न ठेवता आपली कला लोकांत पोहोचवली आणि नवीन कलाकार घडविले.

दैनिक गोमन्तक

Goa Artists : पूर्वी कलाकारांनी मेहनत घेऊन कसल्याच प्रकारच्या मानधनाची अपेक्षा न ठेवता आपली कला लोकांत पोहोचवली आणि नवीन कलाकार घडविले. या कलाकारांची एखाद्या गावातील संस्थेकडून दखल घेऊन त्यांचा सत्कार करणे हाच त्यांचा सन्मान आहे. सरकारमार्फत अशा कलाकारांना योग्य ते मानधन मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न असतील, असे प्रतिपादन मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांनी केले.

मोरजी येथील श्री मोरजाई मंडपात श्रीमान योगी मंडळाने आयोजित केलेल्या २५व्या अभंग गायन स्पर्धेतील बक्षीस वितरण आणि ज्येष्ठ कलाकारांच्या सत्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मोरजी जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर, श्री मोरजाई देवस्थान समितीचे अध्यक्ष गोपाळ शेटगावकर, श्रीमान योगी मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत शेटगावकर, रमेश शेटगावकर, विठ्ठल सावंत, ज्येष्ठ भजनी कलाकार कृष्णा नाईक, साहित्यिक निवृत्ती शिरोडकर आदी उपस्थित होते.

गौरवमूर्ती असे...

यावेळी कृष्णा शेटगावकर, नवसो शेटगावकर, शंभू शेटगावकर, ज्ञानेश्वर गवंडी, महानंदा शेटगावकर, नामदेव शेटगावकर, प्रकाश सप्तोजी, शिवाजी शेटगावकर, हनुमंत शेटगावकर, कृष्णा नाईक, भगवान हळणकर, गोवेकर आदींचा शाल-श्रीफळ देऊन पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यांना मिळाली बक्षिसे

यावेळी श्रीमान योगी मंडळाने आयोजित केलेल्या पंचविसाव्या अभंग गायन स्पर्धेतील प्रथम बक्षीस- ओंकार शेटगावकर, द्वितीय- नंदकिशोर नाईक, तृतीय- सूरज शेटगावकर व उत्तेजनार्थ बक्षिसे- श्रीखंड शिरोडकर, उत्कर्ष गोवेकर आणि राजेंद्र मांजरेकर यांना प्रदान करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT