AAP Goa Dainik Gomantak
गोवा

AAP Goa: गोव्यात केजरीवालांच्या 'आप'ला झटका, नव नियुक्तीनंतर दुसऱ्या दिवशी पहिला राजीनामा

राज्यातील विविध मुद्यांवर आक्रमक भूमिका घेणाऱ्या म्हणून कुतिन्हो यांची ओळख होती.

Pramod Yadav

AAP Goa: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने गोव्यात नवी कार्यकारिणी जाहीर केली. यात राज्यातील पक्षाची धुरा अमित पालेकर यांच्याच हाती ठेवली असून, आमदार वेन्झी व्हिएगश व क्रुझ सिल्वा यांची राष्ट्रीय संयुक्त सचिव व राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे.

तर, इतर विविध 27 सदस्यांनी नियुक्ती केली आहे. दरम्यान, नियुक्ती एक दिवस होतो तोवर यातील एका पदाधिकाऱ्यांने पद आणि पक्षाच्या सदस्याचा राजीनामा दिला आहे.

आपच्या वतीने मंगळवारी 27 सदस्यांची यादी जाहीर करण्यात आली. यात प्रतिमा कुतिन्हो, संदेश तेलेकर देसाई, सिद्धेश भगत, सुनील सिग्नापूरकर आणि रॉक मास्करेन्हास यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

यापैकी प्रतिमा कुतिन्हो यांनी प्रदेश उपाध्यक्षपद आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. नियुक्तीच्या दुसऱ्याच दिवशी हा राजीनामा दिल्याने पक्षासाठी हा मोठा झटका मानला जात आहे. राज्यातील विविध मुद्यांवर आक्रमक भूमिका घेणाऱ्या म्हणून कुतिन्हो यांची ओळख होती.

गोव्यातील आपचे कोणाकडे कोणते पद

सुरेल तिळवे यांची प्रदेश सरचिटणीसपदी तर फ्रांसिस कोएल्हो यांची प्रदेश सरचिटणीस (प्रचार व संवाद) नियुक्ती करण्यात आली आहे. सिद्धेश भगत मुख्य प्रवक्ते.

पदाधिकारी- अनिल गावकर (अनुसूचित जमाती अध्यक्ष), उपेंद्र गावकर (इतर मागासवर्गीय अध्यक्ष), हांझल फर्नांडिस (अल्पसंख्याक अध्यक्ष), रोहन नाईक (युवा अध्यक्ष), सुषमा गावडे (महिला उत्तर अध्यक्ष) आणि पॅट्रीसिया फर्नांडिस (महिला दक्षिण अध्यक्ष).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT