Hotel Silver Sand Dainik Gomantak
गोवा

वादग्रस्त सिल्व्हर सँड हॉटेलवरील कारवाई नेमकी का रखडली?

हॉटेलच्या पाडकामासाठी लाखोंचा खर्च अपेक्षित; सार्वजनिक बांधकाम खात्याकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र

दैनिक गोमन्तक

मडगाव : सीआरझेड कायद्याची पूर्णपणे पायमल्ली करून कोलवा येथे उभारण्यात आलेले सिल्व्हर सँड हे हॉटेल पाडण्यात यावे असा आदेश जारी होऊन कित्येक महिने उलटले आहेत. मात्र ही कारवाई अजूनही रखडल्याचं चित्र आहे. याचे महत्त्वाचं कारण म्हणजे हे बांधकाम पाडण्यासाठी तब्बल 13.89 लाख रुपयांचा खर्च येणार आहे. जोपर्यंत या खर्चाला मंजुरी मिळत नाही तोपर्यंत हे काम करण्यास सार्वजनिक बांधकाम खाते तयार नसल्याची माहिती आहे.

या खात्याचे कार्यकारी अभियंते प्रसाद पाणंदीकर यांनी मडगाव उपजिल्हाधिकारी कार्यालयाला लिहिलेल्या पत्रात या कामाच्या खर्चाचा तपशील देताना त्यासाठी निविदा जारी करावी, अशी मागणी केली आहे.

हे बांधकाम पाडण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयानेही स्थगिती न दिल्याने शेवटी मागच्या महिन्यात ही कारवाई निश्चित केली होती. मात्र हा खर्च कोण देणार असा मुद्दा उपस्थित करून सार्वजनिक बांधकाम खात्याने ही कारवाई करण्यास असमर्थता दाखविली होती.

सार्वजनिक बांधकाम खात्याने यापूर्वी अशीच कारवाई केली होती, पण त्यासाठी त्यावेळी 12.98 लाख खर्च आला होता. हा खर्च जिल्हा प्रशासनाने अजून मंजूर न केल्याने जोपर्यंत हा खर्च मंजूर होत नाही तोपर्यंत आणखी अशी कामे करण्यास सार्वजनिक बांधकाम खाते तयार नाही.
या बांधकामाविरोधात तक्रार दाखल केलेल्या कोलवा सिव्हिक फोरमच्या अध्यक्ष ज्यूडीत आल्मेदा यांनी याबाबत तीव्र नापसंती व्यक्त करताना अशी कारवाई करण्यासाठी येणारा खर्च प्रशासनाने कायद्याची पायमल्ली करून बांधकामे उभारणाऱ्या बांधकाम मालकाकडून आगाऊ डिपॉझिट करून घ्यायला हवी अशी मागणी केली.

अशा कारवाया इतर खात्याच्या असमर्थतेमुळे अडून राहू नये यासाठी आता सीआरझेड प्राधिकरणाने स्वतःची स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची गरज आल्मेदा यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT