Real Estate Market Dainik Gomantak
गोवा

Real Estate Market: गोव्याला मागे टाकत आग्राने मारली बाजी; रिएल इस्टेट क्षेत्रात कोणत्या शहरातून मिळतोय मोठा परतावा? वाचा

Goa Real Estate Market: आग्रा सध्या मालमत्तांवर ९४ टक्के परतावा देत आहे, तर गोवा ९० टक्के परतावा देत आहे.

Pramod Yadav

केवळ पर्यटन नव्हे तर गेल्या काही वर्षांत आग्रा देशातील सर्वात महागडे रिअल इस्टेट क्षेत्र देखील म्हणून देखील नावारुपास आले आहे. फक्त ४ वर्षांत आग्रातील मालमत्तांच्या दरांमध्ये ९४ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. मेट्रो शहरांनंतर, आग्रा रिअल इस्टेट क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे तसेच, येथे लोकांना उत्तम परतावे देखील मिळत आहेत.

प्रॉप इक्विटीच्या विश्लेषणानुसार, २०२० ते २०२४ दरम्यान आग्रा हे देशातील टियर २ शहरांमध्ये आघाडीवर आहे. गोवा आणि लुधियाना सारख्या शहरांना मागे टाकत आग्रा मालमत्तांवर उत्तम परतावा देणारे शहर ठरले आहे.

आग्रा सध्या मालमत्तांवर ९४ टक्के परतावा देत आहे, तर गोवा ९० टक्के परतावा देत आहे. लुधियानामध्ये ८९ टक्के वाढ झालीय. इंदूर ७२ टक्के, चंदीगड ७० टक्के आणि देहरादून ६८ टक्के परतावा देत आहे. यापूर्वी दुर्लक्षित असलेल्या शहरांकडे गुंतवणूकदारांनी मोर्चा वळवला असल्याचे या आकडेवारीवरुन दिसून येते.

त्रिवेंद्रम, मंगलोर, भुवनेश्वर आणि अहमदाबाद ही शहरे ५४ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदविणाऱ्या टॉप १० शहरांमध्ये आहेत. यासोबतच म्हैसूर, भोपाळ आणि नागपूर सारखी शहरेही ५० टक्के परतावा देत आहेत. या तेजीचे खरे कारण म्हणजे पायाभूत सुविधांचा झालेला विकास, मेट्रो शहरांमध्ये वाढता दबाव, यामुळे गुंतवणूकदार लहान शहरांकडे वळत आहेत, असे प्रॉप इक्विटीच्या जुलै २०२४ च्या अहवालात असे नमूद करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT