Ravi Naik  Dainik Gomantak
गोवा

कोडार येथे आता कृषी महाविद्यालय होणार

यंदापासून अभ्यासक्रम सुरू; कृषीमंत्री रवी नाईक यांचे प्रयत्न

दैनिक गोमन्तक

फोंडा : राज्यात प्रथमच कृषी महाविद्यालय साकारणार असून यंदापासूनच अभ्यासक्रमाला सुरवात होणार आहे. फोंड्यातील कोडार - बेतोडा येथे कृषी खात्याच्या वास्तूत हे कृषी महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. कोडार येथील कृषी खात्याच्या विस्तीर्ण जागेचा वापर या कृषी महाविद्यालयासाठी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान कृषीमंत्री रवी नाईक यांनी दिली.

कोडार येथील या कृषी महाविद्यालयात कृषीविषयक पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. विज्ञान शाखेतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या कृषीविषयक पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जाणार आहे. साधारण चाळीस विद्यार्थ्यांची तुकडी या पदवी अभ्यासक्रमाचा लाभ घेऊ शकेल, असेही रवी नाईक म्हणाले.

कृषीविषयक समितीतर्फे हा प्रस्ताव चालीस लावण्यात आला आहे. सरकारच्या या कृषी समितीने राज्यात पहिलेच कृषी महाविद्यालय उभारण्यासाठी सहकार्य केले असल्याने यंदापासूनच पहिल्या अभ्यासक्रमाला सुरुवात होणार असल्याचे रवी नाईक यांनी सांगितले.

कृषीधनाला देणार प्रोत्साहन

राज्यातील कृषी लागवड वाढवण्याबरोबरच कृषी व्यवसायातून आत्मनिर्भर भारत व स्वयंपूर्ण गोव्याच्या निर्मितीला या कृषी लागवडीतून प्रोत्साहन मिळणार असल्याची माहिती कृषीमंत्री रवी नाईक यांनी दिली. आपापल्या शेतीत विविध कृषी लागवड करण्यासाठी सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येत असून कृषी खात्याच्या या योजनाही क्लिष्ट न होता, सुटसुटीत आणि सोप्या कशा होतील, याकडे कटाक्ष ठेवण्यात आला आहे. कृषी खात्याच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी कृषी कार्डची आवश्‍यकता लागत असल्याने हे कृषी कार्ड करण्यासाठी खडपाबांध - फोंड्यात कृषीमंत्री रवी नाईक यांच्या कार्यालयातही संबंधित शेतकऱ्यांना मार्गदर्शन व सहकार्य करण्यात येत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

सध्याचे कृषी अभ्यासक्रम

महाराष्ट्रातील कोकणामध्ये दापोली - रत्नागिरी येथे कृषी महाविद्यालय असून गोव्यात सावईवेरे येथे रायकर कृषी विद्यालयातर्फे दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम सध्या शिकवला जातो. सावईवेरे येथील या कृषी अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद असून पदवी अभ्यासक्रमासाठी कोडार-फोंड्यात आता नव्याने सुविधा उपलब्ध होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT