Dog Dainik Gomantak
गोवा

Stray Dogs Attack: दुर्दैवी! भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यातील जखमी चोडणकरांचा उपचारादरम्यान मृत्यू!

Stray Dogs Attack: राज्यभरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना मागील काही दिवसात वाढल्याच्या दिसून येत आहेत.

Manish Jadhav

Stray Dogs Attack: राज्यभरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना मागील काही दिवसात वाढल्या आहेत. गोव्यात ठिकठिकाणी अशा अनेक घटना नागरिकांसह पर्यटकांसोबतही घडत आहेत. यातच, काही दिवसांपूर्वी वास्को येथे कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात रावळनाथ (बिपीन) चोडणकर जखमी झाले होते. चोडणकर यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी आली आहे. बिपीन हे वीज विभागात मीटर रीडर (कंत्राटी कर्मचारी) म्हणून काम करत होते.

दरम्यान, भटक्या कुत्र्यांचे वाढते हल्ले लक्षात घेता सरकारने योग्य ती पावले उचलावीत अशी सर्व सर्वस्तरातून मागणी होत आहे. भटक्या कुत्र्यांचे हल्ले टाळण्यासाठी त्यांची पैदास रोखणे गरजेचे असल्याचे मत पशुवैद्यकीय शल्यचिकित्सकांनी व्यक्त केले आहे. या घटना टाळण्यासाठी सरकारतर्फे प्राणी जन्म नियंत्रण (ABC) उपक्रम राबवण्यात येतोय.

डिचोलीतही भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर

दुसरीकडे, डिचोलीतही दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर बनत चालली आहे. या भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहरातील कदंब बसस्थानकावर दोन प्रवाशांचे कुत्र्यांनी चावे घेतल्याची माहिती काही दुकानदारांकडून देण्यात आली. शहरातील या भटक्या कुत्र्यांचा पालिकेने बंदोबस्त करावा. अशी मागणी ग्राहक, प्रवासी आणि जनतेकडून करण्यात येत आहे. दरम्यान, शहरातील भटक्या कुत्र्यांचे लवकरच निर्बीजीकरण करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: पर्वरीत बर्निंग कारचा थरार; कार जळून खाक

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT