Rare Gray slender loris Spotted In Goa 
गोवा

Gray slender loris: सत्तरीत आढळला नामशेष म्हणून वर्गीकृत दुर्मिळ 'वनमानव', भरवस्तीतील पहिलीच घटना

Rare Gray slender loris Spotted In Goa: नागवेतील परवार यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या लाकडी कंपाऊंडवर ‘वनमानव’ बसलेला दिसला.

गोमन्तक डिजिटल टीम

Rare Gray slender loris Spotted In Goa

गेल्या काही वर्षांत अनियंत्रित डोंगरकापणी आणि वृक्षतोडीसारखे प्रकार घडल्याने वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास जवळपास धोक्यात आला आहे. बिबटे, गवे, रानडुक्कर, हत्ती आणि क्वचितच वाघांचा संचार आता मानवी वस्तीत दिसून येतो. असाच काहीसा प्रसंग सोमवारी रात्री ७ ते ८ वा.च्या दरम्यान नागवे-वाळपई येथे घडला.

समोर आलेल्या माहितीनुसार, नागवेतील परवार यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या लाकडी कंपाऊंडवर ‘वनमानव’ बसलेला दिसला. याची माहिती वर्षा परवार या मुलीने आपला मोठा भाऊ रामकृष्ण याला दिली.

रामकृष्णने ही माहिती वाळपई येथील ॲनिमल रेस्क्यू स्क्वॉडचे कार्यकर्ते प्रदीप गवंडळकर यांना दिली. त्यानंतर गवंडळकर हे ॲनिमल रेस्क्यू स्क्वॉडचे अमृत सिंह यांच्यासह घटनास्थळी आले. अमृत सिंह यांनी त्वरित ‘जीपीएस फोटो’ घेतले.

अशाप्रकारचा प्राणी सत्तरीसारख्या भागात मिळण्याची ही पहिलीच वेळ असावी. या प्राण्यांबाबत आपण आपल्या वडीलधाऱ्यांकडून अनेक गोष्टी ऐकल्या, असे अमृत सिंह म्हणाले. अमृत सिंह गावात पोहोचण्याआधीच परवार कुटुंबातील चंद्रावती परवार या वयस्क महिलेने त्याला हळद-कुंकू लावून त्याची पूजाही केली होती.

त्यानंतर प्रदीप गवंडळकर यांनी वन विभागाला याची माहिती दिली. माहिती मिळताच आरएफओ शामसुंदर गावस यांनी ‘वनमानवा’ला तत्काळ जंगलात सोडून देण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे वाइल्ड लाईफ रेस्क्यू स्क्वॉडचे विनोद सावंत व विशांत गावकर यांनी त्याला त्याच रात्री जंगलात सोडून दिले.

‘जवळपास नामशेष’ म्हणून वर्गीकृत

हा प्राणी भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ च्या अनुसूची I अंतर्गत सूचीबद्ध आहे. या अन्वये त्यांना सर्वोच्च पातळीचे कायदेशीर संरक्षण प्राप्त आहे. तसेच इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर (आययूसीएन)ने ‘लुप्तप्राय’ श्रेणीमध्ये त्याला लाल यादीत टाकले आहे. या प्राण्यास २०१८ मध्ये ‘जवळपास नामशेष’ म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: "तुझ्या पतीच्या स्पर्ममध्ये विष, माझ्यासोबत संबंध ठेव" पाद्रीचा उपचाराच्या नावाखाली लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

Vaibhav Sooryavanshi: रोहित, विराट, गावस्कर सोडा...'या' खेळाडूकडून मिळते वैभव सूर्यवंशीला जिद्द, चिकाटी आणि प्रेरणा; स्वतःच केला खुलासा

Ashadhi Ekadashi 2025: टाळ-मृदुंगाचा निनाद आणि विठ्ठलनामाचा गजर...आषाढी एकादशीला पंढरपुरात काय-काय करतात?

Goa Live News Updates: गोवा डेअरीच्या दूध उत्पादकांना 12 कोटी 70 लाख रुपये मंजूर

Goa Accident: छत्रीमुळे गेला जीव! स्कुटरवरून पडून महिलेचा दुर्दैवी अंत

SCROLL FOR NEXT