Rapist teacher from Goa came to police station and surrendered Dainik Gomantak
गोवा

अखेर बलात्कारी शिक्षकाने पोलिस ठाण्यात येऊन पत्करली शरणागती

कुंकळ्ळी पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, संशयित सदर पीडितेवर अल्पवयीन अवस्थेत असल्यापासून ते आतापर्यंत अत्याचार करून तिचा छळ करत होता.

दैनिक गोमन्तक

सासष्टी: कुंकळ्ळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शिकवणीसाठी येणाऱ्या अल्पवयीन मुलीवर 2010 पासून बलात्कार करत असल्याचा आरोप असलेला मायकल क्रास्टो या ट्युशन टीचरने न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी केलेला अर्ज होता. पण, हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावल्याने त्याने गुरुवारी कुंकळ्ळी पोलिस ठाण्यात येऊन शरणागती पत्करली.

कुंकळ्ळी पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, संशयित सदर पीडितेवर अल्पवयीन अवस्थेत असल्यापासून ते आतापर्यंत अत्याचार करून तिचा छळ करत होता. 2010 साली संशयित पीडित युवतीची शिकवणी घेण्यासाठी येत होता. यावेळी संशयिताने अनेक वेळा तिच्यावर बलात्कार केला आणि याबाबत कुणाला सांगितल्यास तिचे नाव बदनाम तसेच तिच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. सलग अत्याचार करून तिच्यावर दोन वेळा मातृत्व लादले, तर दोन्ही वेळा तिचा गर्भपात करण्यात आला, असे तक्रारीत म्हटले आहे.

संशयिताच्या अत्याचाराला कंटाळून युवतीने अनेकवेळा आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. संशयिताच्या सतत पाठलाग करण्याच्या वृत्तीमुळे मुलीने शिक्षणही सोडले, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. कुंकळ्ळी पोलिसांनी संशयित मायकल क्रास्टो (अंदाजे वय 50) यांच्याविरोधात बलात्कार, गोवा बाल कायदा, पोक्सॉ कायदा व एट्रोसीटी कायद्याखाली गुन्हा नोंद केला असून, या प्रकरणी पोलिस पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT