Rapid antigen test of Covid at Dodamarg check post in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa: दोडामार्ग तपासणी नाक्यावर 'कोविड' ची रॅपिड अँटीजन टेस्ट

गोवा राज्य (Goa) 'कोविड' (Covid-19) मुक्त करण्यायाठी दोडामार्ग तपासणी नाक्यावर 'कोविड'ची रॅपिड अँटीजेन चाचणी (Rapid antigen Testing) मोहीम राबवण्यात येत आहे.

दैनिक गोमन्तक

डिचोली: राज्य (Goa) 'कोविड' (Covid-19) मुक्त करण्याच्या मोहिमेंतर्गत फिरत्या पथकाव्दारे दोडामार्ग तपासणी नाक्यावर 'कोविड'ची रॅपिड अँटीजेन चाचणी (Rapid antigen Testing) मोहीम राबवण्यात येत आहे. या विशेष मोहिमेव्दारा राज्याबाहेरून येणाऱ्या प्रवाशांची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात येत आहे. आरोग्य खाते आणि डिचोली मामलेदार कार्यालयाच्या सहकार्याने उत्तर गोवा जिल्हा प्रशासनातर्फे ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. रॅपिड अँटीजेन चाचणी केल्यानंतर लगेचच चाचणीचा अहवाल स्पष्ट होतोय.

डिचोलीत 126 जणांची चाचणी

या फिरत्या पथकाव्दारे डिचोली बाजारात चाचणी मोहीम राबविण्यात आली. या रॅपिड अँटीजेन चाचणी मोहिमेंतर्गत बाजारातील व्यापारी, विक्रेते, ग्राहक आदी मिळून 126 जणांची 'कोविड'' चाचणी करण्यात आली. त्यात एकाही नागरिकाचा अहवाल सकारात्मक निघाला नाही. अशी माहिती मिळाली आहे.

100 टक्के कोविड लसीकरणाचे सरकारचे लक्ष्य

गोव्यात जुलै 2021 पर्यंत कोविडच्या पहिल्या डोसचे 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे सरकारचे उद्दीष्ट असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज सांगितले. सध्या गोव्यात तिसऱ्या टिका उत्सवाला चांगला प्रतिसाद मिळत असून दरदिवशी 20 हजार नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. राज्यात कोविडची स्थिती सुधारत असली, तरी धोका पूर्ण टळलेला नाही. शिवाय कोविडची तिसरी लाट येण्याची भीती असल्याने सरकारने सर्व तयारी केली आहे. आम्हाला अजूनही सर्व उपाय घ्यावे लागतील, सावधगिरी बाळगावी लागेल. आम्ही राज्यात सर्वोत्तम आरोग्य सुविधा निर्माण केल्या आहेत. तसेच देशात गोवा हे 100 टक्के लसीकरण पूर्ण केलेले राज्य व्हावे हे सरकारचे लक्ष्य असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT