Ranjita Pai Dainik Gomantak
गोवा

Ranjita Pai : गोवा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रंजिता पै

अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे

Rajat Sawant

Ranjita Pai : गोवा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रंजिता पै यांची निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती आज करण्यात आली. महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

रंजिता पै यांनी वयाच्या 45व्या वर्षी मास्टर्स इन पब्लिक सोशल वर्क हा अभ्यासक्रम पुर्ण केला असून संशोधन कार्यामध्ये एम फार्म पदवी मिळविली आहे. तसेच सहा महिने कारवारमधील महाविद्यालयाच्या प्राचार्या म्हणुनही काम केलेले आहे.

गोवा राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे या पदाला व पिडित महिलांना योग्य न्याय मिळवुन देण्याचा आपला प्रयत्न असेल असे गोवा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेल्या रंजिता पै यांनी 'गोमन्तक'ला सांगितले.

रंजिता पै यांनी मडगाव भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा, मडगाव भाजप मंडळाच्या सरचिटणीस व 2020 पासुन राज्य महिला मोर्चाच्या सरचिटणीस पदी राहिल्या आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष  सदानंद शेट तानावडे, आमदार दिगंबर कामत, शर्मद पै रायतुरकर, मडगाव मधील भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT