Vagheri Hill Cutting Dainik Gomantak
गोवा

वाघेरीतील डोंगरकापणी अंगलट; वनाधिकाऱ्याचं निलंबन

वनमंत्री विश्वजीत राणे अॅक्शन मोडमध्ये; वाघेरी संरक्षित करण्यासाठी हालचाली

दैनिक गोमन्तक

पणजी : वाघेरी परिसर संरक्षित करण्याचे संकेत दिल्यानंतर वनमंत्री विश्वजीत राणे अॅक्शन मोडमध्ये आले आहे. वाळपईजवळील वाघेरी भाग पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून जाहीर करण्याची गरज विश्वजीत राणेंनी नुकतीच व्यक्त केली होती. आता वाघेरीतील डोंगर कापणीप्रकरणी रेंज फॉरेस्ट अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलं आहे. तसंच उप वनसंरक्षकांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे.

राज्यात वाघेरीसारखे अनेक परिसर आहेत, जे पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून जाहीर होणे गरजेचे आहे. यासाठी येत्या सहा महिन्यांत केंद्र सरकारच्या मदतीने वाघेरी वन्यजीव संवेदनशील परिसर म्हणून जाहीर करणार असल्याची माहिती वनमंत्री राणे यांनी दिली होती. गोमन्तकला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी वाघेरी संरक्षित करण्याचे संकेत दिले होते.

वाघेरी डोंगरावर सध्या मोठ्या प्रमाणावर डोंगरकापणी उघडकीस आली आहे. आपण याप्रकरणी मुख्य वनसंरक्षकांना आरएफओ म्हणजेच रेंज फॉरेस्ट ऑफिसरला निलंबित करण्याचे निर्देश दिले असून उपवनसंरक्षकांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यास सांगितल्याचं विश्वजीत राणेंनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं आहे. जर समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर उपवनसंरक्षकांचंही निलंबन केलं जाईल असं राणेंनी स्पष्ट केलं आहे.

वाघेरी टेकडीवरील जंगलाच्या साफसफाईचे काम नुकतेच पुन्हा सुरु झाले होते. ही टेकडी गोव्याच्या पश्चिम घाटाचा भाग आहे. इको-टुरिझम प्रकल्पासाठी मार्ग तयार करण्यासाठी वनक्षेत्र साफ करण्याचे काम सर्वप्रथम जानेवारी 2022 पूर्वी सुरू झाले, जे कोरोना संबंधित निर्बंधांमुळे थांबले होते. गोव्याच्या वन विभागाच्या वन्यजीव विभागाने चेकपोस्ट स्थापित करून वाघेरी टेकडीवर प्रवेश करण्यास मनाई केली. त्यामुळे ते काम ठप्प झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठ्या घडामोडी, रोहित शर्मा पुन्हा कर्णधार होणार?

SCROLL FOR NEXT