रमेश तवडकर Dainik Gomantak
गोवा

मान्‍सूनपूर्व कामे पूर्ण करा; रमेश तवडकरांचा निर्देश

बंद असलेल्या कामासंदर्भात विचारविनिमय करण्यात आला.

दैनिक गोमन्तक

आगोंद: काणकोण तालुक्याला भेडसावणाऱ्या विविध समस्‍यांबाबत आज सभापती तथा स्थानिक आमदार रमेश तवडकर यांनी श्रीस्थळ येथील शासकीय विश्रामधाम येथे विविध सरकारी खात्यांच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच मान्‍सनपूर्व कामे वेळेत मार्गी लावण्‍याचा आदेश दिला.

सरकारी पातळीवर सुरू असलेल्या व काही बंद असलेल्या कामासंदर्भात विचारविनिमय करण्यात आला. यामध्ये सार्वजनिक बांधकाम खाते, जलस्रोत खाते, वीज खाते आणि पाणी वितरण विभागाचा समावेश होता. यावेळी नगराध्यक्ष सायमन रिबेलो, भाजप मंडल अध्यक्ष विशाल देसाई, नगरसेवक रमाकांत नाईक गावकर, हेमंत नाईक गावकर, माजी नगरसेवक किशोर शेट, सम्राट भगत, किरण नाईक गावकर यांची उपस्‍थिती होती. त्‍यांनी विविध खात्यासंबंधी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करून मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्याची मागणी केली. सभापती तवडकर यांनी प्राधान्यक्रमाने मान्सूनपूर्व कामे महिनाभरात पूर्ण करण्याचा आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Childhood Depression: स्मार्टफोन आणि नैराश्य

Goa Monsoon: गोव्यात मान्सूनचे आगमन; हवामान विभागाडून चार दिवसांचा 'यलो अलर्ट'!

मालपे येथील संरक्षक भिंत पुन्हा धोक्यात; पावसाळ्यापूर्वी तातडीने दुरुस्ती करण्याची स्थानिकांची मागणी

Goa Power Cuts: हसापूर, हणखणेतील वीज समस्या सोडवा; काँग्रेस कार्यकर्त्यांची वीज कार्यालयावर धडक, साहाय्यक अभियंत्यांशी चर्चा

Hasapur Bridge: हसापूर पूल महिन्याभरात वाहतुकीस खुला; काँक्रीटचे काम पूर्ण

SCROLL FOR NEXT