Ramesh Tawadkar|Canacona Dainik Gomantak
गोवा

Shram Dham Yojana: गोव्यात गरजूंसाठी 'एक हजार घरे' उभारणार; सभापती तवडकर यांची घोषणा

गोमन्तक डिजिटल टीम

Shram Dham Scheme

काणकोण: येत्या सहा वर्षांत श्रमधाम योजनेतून राज्यात एक हजार घरांची उभारणी करण्यात येणार असल्याची घोषणा सभापती डॉ. रमेश तवडकर यांनी चावडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या देणगी कुपन्स निकाल जाहीर करताना केली.

यावेळी उपनगराध्यक्ष नार्सिस्को फर्नांडिस, नगरसेवक रमाकांत नाईक गावकर, गंधेश मडगावकर, सायमन रिबेलो, शुभम कोमरपंत, धीरज नाईक गावकर, निवृत्त मुख्याध्यापक शांताजी नाईक गावकर, उपजिल्हाधिकारी मधू नार्वेकर, नगर नियोजन खात्याचे सागर नावेलकर, खोतिगावचे सरपंच आनंदु देसाई तसेच मंडळाचे ज्येष्ठ सदस्य मोलू देसाई, ॲण्ड्र्यू डिकॉस्टा उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष दीपक नाईक देसाई, सचिव अजय फळदेसाई, खजिनदार राजेश नाईक यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी शांताजी नाईक गावकर, रमाकांत नाईक गावकर आणि आनंदु देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. रणजीत देसाई यांनी सूत्रसंचलन आणि प्रास्ताविक केले.

असाहाय्य घटकांना घरकुल

गरीब, विकलांग व विधवा महिलांना सरकारी घरबांधणी योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांची जमवाजमव करणे शक्य होत नसल्याने ते अशा योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत. त्याचसाठी बलराम चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अशा असाहाय्य घटकांना घरकुल उभारून देण्याच्या उद्देशाने श्रमधाम संकल्पना पुढे आली असल्याचे त्यांनी सांगितले.

‘कात्यायनी’ला पाच लाखांचा निधी

यावेळी सभापती तवडकर यांच्या हस्ते मंडळाचे ज्येष्ठ सदस्य मोलू नाईक देसाई आणि ॲण्ड्र्यू डिकॉस्टा यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मंडळातर्फे पणसुले-किंदळे येथील श्री कात्यायणी बाणेश्वर विद्यालयाला शाळा इमारतीच्या उभारणीसाठी पाच लाख रुपयांचा निधी देण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT