Sanguem Cuncolim protest Dainik Gomantak
गोवा

‘गृहमंत्री गोव्‍याच्‍या मूडवर बोलले, गुंडगिरीवर नाही'; युरींचे टीकास्त्र; काणकोणकर हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सांगे, कुंकळ्ळीत मेणबत्ती मोर्चा

Rama Kankonkar Attack: रामा काणकोणकर यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सांगे, कुंकळ्ळीत आज मेणबत्ती मार्च काढण्यात आला. सरकारच्या कारभारावर टीका करण्यात आली.

गोमन्तक डिजिटल टीम

सांगे: रामा काणकोणकर यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सांगे, कुंकळ्ळीत आज मेणबत्ती मार्च काढण्यात आला. या वेळी राज्यातील सामाजिक कार्यकर्ते तसेच सांगेवासीय मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. या सभेत राज्यातील वाढत्या गुंडागिरीचा निषेध करीत सरकारच्या कारभारावर टीका करण्यात आली.

माजी आमदार प्रसाद गावकर म्हणाले, की रामा काणकोणकर यांचा अहवाल दोन तासांत कसा काय बाहेर पडू शकतो, यावरून पोलीस आणि सरकार संपूर्ण मीडियाला हाताशी धरून जनतेचा आवाज दडपू पाहत आहे. रामासारखा अन्य कुणावरही आता हल्ला होऊ शकतो, त्यामुळे आपण सजग राहायला हवे.

प्रतिमा कुतिन्हो म्हणाल्या, की रामा काणकोणकर यांच्या घटनेतून संपूर्ण गोवा एकत्र येऊ लागला असून सत्ताधाऱ्यांविरोधात लोक रस्त्यावर उतरत आहेत. ते पाहता भविष्यात गोव्यातील जनता गुंडगिरीच्या विरोधात सरकारला धडा शिकवणार आहे.

नगरसेवक मेशू डिकॉस्ता यांनी राज्यातील वाढती गुंडगिरी धोकादायक असून प्रत्येकाने याचा विचार करण्याची गरज व्यक्त केली. विकास भगत, तनोज अडवलंपालकर, शंकर पोळजी यांनी सरकार तसेच पोलीस यंत्रणेवर सडकून टीका केली.

हा गोंयकारावर झालेला हल्‍ला

‘रामा काणकोणकर यांच्‍यावर झालेला हल्‍ला हा गोंयकारावर झालेला हल्‍ला आहे. काँग्रेसही सत्तेत होती; परंतु लोकांना कधी त्रास होऊ दिला नाही. गोवा वाचविण्‍यासाठी एकजूट आवश्‍‍यक आहे’, अशी साद विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी घातली. कुंकळ्ळी बसस्‍थानक परिसरात रविवारी रात्री मेणबत्ती मोर्चा काढण्‍यात आला.

यावेळी युरी आलेमाव यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. ‘गृहमंत्र्यांनी गोव्‍याच्‍या ‘मूड’चा उल्‍लेख केला; परंतु गोव्‍यातील गुंडगिरी, गुन्‍हेगारीवर भाष्‍य केले नाही, अशी खंत आलेमाव यांनी व्‍यक्‍त केली. गोव्‍यात परप्रांतीय वाढत आहेत. ते यायला हरकत नाही; परंतु येथील जमिनी लाटल्‍या जात आहेत. गोवा उद्धवस्‍त केला जात असल्‍यास सहन केले जाणार नाही’, असे आलेमाव म्‍हणाले. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते उपस्‍थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahu Gochar 2026: अडकलेली कामे मार्गी लागणार! 'या' 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस; राहू ग्रहाची 'युवावस्था' पालटणार नशीब

Shikhar Dhawan: बांगलादेशातील हिंदू महिलेवरील अत्याचारावर संतापला 'गब्बर'; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला, "अशी हिंसा सहन केली जाणार नाही!"

"प्लीज, कोणालाही सांगू नका!", डोनाल्ड ट्रम्प यांनी उडवली फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षाची जाहीर खिल्ली; औषधांच्या किमतीवरुन दिला होता दम

Horoscope: बुद्धी आणि चातुर्याचा विजय! 'या' राशींना मिळणार भाग्याची साथ, वाचा तुमचे राशी भविष्य

Spot Fixing Scandal: क्रिकेट विश्वाला हादरवणारी 'अंडरकव्हर' स्टोरी! स्टॉपवॉच अन् रेकॉर्डिंगनं कसं उद्ध्वस्त केलं खेळाडूंचं करिअर? आकाश चोप्राचा व्हायरल VIDEO चर्चेत

SCROLL FOR NEXT