Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Yuri Alemao: एक दिवसाचे ‘राम नाम सत्य है’ : आलेमाव

विधानसभा कामकाजाच्या कालावधीत कपात

दैनिक गोमन्तक डिजिटल

Yuri Alemao : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारमध्ये विरोधकांना तोंड देण्याची हिंमत नाही. विधानसभा सचिवांनी पाच दिवसांच्या अधिवेशनाचा कालावधी कमी करून तो चार दिवसांचा केल्याचे सूचनापत्र जारी केले आहे.

त्यामुळे एक दिवसाच्या सत्रावर संक्रांत आल्याने विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी त्या एका दिवसाचे सरकारने ‘राम नाम सत्य है’ केल्याची टीका केली. काँग्रेसचे आमदार ॲड. कार्लुस फेरेरा आणि एल्टन डिकॉस्ता यांच्यासह काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर आलेमाव यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 19 खाती, दुसऱ्या दिवशी 14, तिसऱ्या दिवशी 16 आणि चौथ्या दिवशी 13 खात्यांवर प्रश्न विचारावे लागणार आहेत. दररोज फक्त 3 तारांकित प्रश्न आणि 15 अतारांकित प्रश्न मांडण्याची मर्यादा घातली आहे.

म्हादई, बेरोजगारी, इंधन दरवाढ, जीवघेणे रस्ते अपघात, गुन्ह्यांमध्ये वाढ, प्रस्तावित वीज दरवाढ, ऐतिहासिक ठिकाणे सूचित करण्यात आलेले अपयश यावर आम्ही म्हणणे मांडणार आहोत.

नगर नियोजन कायद्याचे उल्लंघन, जुने गोवेतील बेकायदेशीर बंगला पाडण्यात अपयश, स्मार्ट सिटी प्रकल्पातील भ्रष्टाचार अशा प्रश्नांवर आम्ही सरकारला घेरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारची ही कृती भ्याडपणाची!

आलेमाव म्हणाले, ३० मार्च रोजी रामनवमीची सुट्टी जाहीर करणे ठीक होते. परंतु सरकारने अधिवेशनाचा एक दिवस वाढवून कामकाजाचे वेळापत्रक बदलायला हवे होते. अधिवेशनाचा कालावधी कमी करण्याची सरकारची कृती भ्याडपणाची आहे. वेळापत्रकात बदल झाल्याने विविध खात्यांशी संबंधित प्रश्न मांडण्यावर बंधने आली आहेत.

बेकायदा कामांना ‘बॉस’चे समर्थन

आमदार ॲड. फेरेरा म्हणाले की, सरकारने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. सर्वत्र नियमांचे उल्लंघन केल्याची उदाहरणे वारंवार पाहायला मिळतात. ‘गॉडफादर’च्या आशीर्वादाशिवाय हे होऊ शकत नाही. बेकायदा कामांना भाजपमधील ‘बॉस’चे समर्थन असल्याचा आरोप त्यांनी केला. आमदार डिकॉस्ता यांनीही यावेळी सरकारवर कडाडून टीका केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अमेरिकन टॅरिफ अन् इराण युद्धानं जपानचं मोडलं कंबरडं, 1 लाख कोटींच्या व्यापार तुटीनं हादरलं टोकियो; ऑटोमोबाईल क्षेत्राला धक्का

Gajlakshmi Rajyog Benefits: पैशांचा पाऊस अन् भाग्याची साथ! 14 मे ला शुक्र-गुरुच्या युतीनं बनणार 'गजकेसरी राजयोग'; बँक बॅलन्समध्ये होणार दुपटीनं वाढ

गोव्यात पुन्हा भाषावादाचा 'वणवा' पेटणार? 1986 च्या इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे! मराठी राजभाषेच्या मागणीसाठी 'एल्गार'

IPL 2026 Points Table: पॉईंट्स टेबलमध्ये हैदराबादची 'सुपरफास्ट' एक्सप्रेस! राजस्थान रॉयल्सला पछाडत गाठला तिसरा नंबर; 'ऑरेंज आर्मी' जोमात

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाचा 'फायनल कॉल'! 30 एप्रिलपर्यंत मेमोरँडम सादर करण्याची संधी; वेतन-भत्त्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी कर्मचाऱ्यांना 'लास्ट चान्स'

SCROLL FOR NEXT