Ram Manohar Lohia 
गोवा

राम मनोहर लोहियांचा आदर्श डोळ्‍यांसमोर ठेवून राज्‍याच्‍या उत्‍कर्षासाठी काम करण्‍याची गरज- आमदार कामत

मडगावच्‍या लोहिया मैदानात कामत यांनी स्‍वातंत्र्‍य सैनिकांच्‍या उपस्‍थितीत लोहियांच्‍या पुतळ्‍याला अभिवादन केले.

सुशांत कुंकळयेकर

Ram Manohar Lohia Death Anniversary: गोव्‍याच्‍या मुक्‍ती लढ्यात डॉ. राम मनोहर लोहिया यांनी केलेल्‍या क्रांतीची सुरुवात हे फार मोठे योगदान असून त्‍यांना गोवा हे एक आदर्श राज्‍य व्‍हावे असे वाटत होते. हा आदर्श डोळ्‍यासमोर ठेवून राज्‍याच्‍या उत्‍कर्षासाठी प्रयत्‍न करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी केले.

डॉ. राम मनोहर लोहिया यांच्‍या 56 व्‍या पुण्‍यतिथीनिमित्त आज मडगावच्‍या लोहिया मैदानात कामत यांनी स्‍वातंत्र्‍य सैनिकांच्‍या उपस्‍थितीत लोहियांच्‍या पुतळ्‍याला अभिवादन केले.

गोव्‍याच्‍या मुक्‍ती चळवळीत 18 जून या तारखेला सर्वांत जास्‍त महत्‍व असून त्‍यामुळेच सरकार हा दिवस राज्‍य पातळीवर साजरे करतो असे कामत यांनी सांगितले.

यावेळी स्‍वातंत्र्‍यसैनिक वामन प्रभुगावकर तसेच विष्‍णू आंगले हे उपस्‍थित होते. मडगावचे नगराध्‍यक्ष दामोदर शिरोडकर, उपनगराध्‍यक्ष दीपाली सावळ, पालिका मुख्‍याधिकारी गौरीश शंखवाळकर तसेच अन्‍य नगरसेवक आणि क्रांतीदिन समितीचे सभासद यावेळी उपस्‍थित होते.

सुरवातीला क्रांती दिन समितीचे अध्यक्ष अविनाश शिरोडकर यांनी सर्वांचे स्वागत केले तर सूत्रसंचालन रजनी रायकर यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT