Ram Mandir : मोरजी, अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणाऱ्या श्रीराम मूर्तीप्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमांच्या आमंत्रण पत्रिकांचे मोरजी परिसरात वाटप करण्यात आले. ग्रामदैवत श्री सत्पुरुष व श्री मोरजाई देवतांस सामुदायिक गाऱ्हाणे करून शुभारंभ करण्यात आला.
श्रीराम मंदिरातील मूर्तीप्रतिष्ठापनादिनी २२ रोजी श्री दत्तात्रेय देवस्थान बागवाडा मोरजी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त सकाळी नित्य पूजा अभिषेक इत्यादी धार्मिक विधी त्यानंतर अभिषेक रामरक्षा हनुमान चालिसा पठण श्रीराम जप दुपारी आरती तीर्थप्रसाद व रमेश दाभोलकर पुरस्कृत महाप्रसाद केला आहे. दुपारी ३.३० वाजता फुगडी भजन व सायंकाळी दीपोत्सव होणार आहे.
सरपंच मुकेश गडेकर, पंच सुरेखा शेटगांवकर, सुप्रिया पोके, ग्राम प्रमुख नयनी शेटगांवकर, माजी सरपंच धनंजय शेटगांवकर, वैशाली शेटगांवकर, रमेश दाभोलकर भालचंद्र तेमकर जनार्दन तांडेल सतिश च्यारी,
देवानंद गावडे, उदय गाडगीळ, राजू नवनाथ बांदेकर, रुपाली पेडणेकर, कल्पना काननाईक, स्वप्नाली पेडणेकर, ज्ञानेश्वर पालयेकर, समीर च्यारी, रामा शेटगांवकर, रवी शेट्ये, मेधा खोत, आनंदी च्यारी, लक्ष्मी शेटगांवकर, भानुदास सावळ, प्रिया सावळ, सुचिता सावळ, दिपा शेटगांवकर, उमाकांत च्यारी, लता मांद्रेकर, सुनिता शिरोडकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.