Gauahar Khan Goa Vacation: पती, मुलासह अभिनेत्री गौहर खानचे गोव्यात व्हेकेशन; पाहा फोटो

गौहर खान तिच्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून गोव्यात सुट्टी घालवताना दिसत आहे.
Gauahar Khan Goa Vacation
Gauahar Khan Goa VacationGauahar Khan Instagram

Gauahar Khan Goa Vacation: बॉलिवूड अभिनेत्री गौहर खान तिचा नवरा आणि लाडक्या मुलासोबत गोव्यात सुट्टी एन्जॉय करत आहे. गौहरने व्हेकेशनचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

गौहर खान तिच्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून गोव्यात सुट्टी घालवताना दिसत आहे.

फोटोंमध्ये गौहर खान तिचा मुलगा आणि पती जैदसोबत बीचवर बसून पोज देताना दिसत आहेत. 'लाइफ...' आणि हार्ट इमोजीसह गौहरने या फोटोला कॅप्शन दिले आहे.

गौहर खान या फोटोंमध्ये प्रिंटेड ड्रेसमध्ये दिसत असून, त्यांचा मुलगा क्रीम आउटफिटमध्ये दिसत आहे. मात्र, या फोटोंमध्येही या जोडप्याने त्यांच्या मुलाचा चेहरा दाखवलेला नाही.

गोव्यातील एका बीचवर निवांत वेळ घालवतानाचा एक व्हिडिओ qजैदने शेअर केल आहे. यात त्यांचा मुलगा समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत खेळताना दिसत आहे.

Gauahar Khan Goa Vacation
गोव्यात कामाच्या शोधात घरातून निघाला, रस्त्यात झाला मृत्यू; बातमी ऐकून आईनेही प्राण सोडला

अभिनेत्री गौहर खानने जैद दरबारशी लग्न केले आहे. जैद अभिनेता असण्यासोबतच तो सोशल मीडिया इन्फ्युएन्सर देखील देखील आहे.

जैद आणि गौहर हे चाहत्यांचे आवडते जोडपे आहेत. दोघेही गेल्या वर्षी एका मुलाचे पालक झाले आहेत.

गौहर खान बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री असून, तिच्या नावावर अनेक हिट चित्रपट आहेत. गौहर नेहमी तिच्या भूमिकांमुळे देखील चर्चेत असते, अनेकवेळा तिला टीकेला देखील समोरे जावे लागले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com