Rakul Preet Singh-Jackky Bhagnani Wedding Dainik Gomantak
गोवा

Rakul Jackky Wedding: रकुल - जॅकीच्या लग्नाला वऱ्हाडी कोण कोण? गोव्यात कलाकारांची मांदियाळी Video

Rakul Jackky Wedding: रकुल आणि जॅकीचे लग्न अतिशय खासगी ठेवण्यात आले असले तरी काही मोजके कलाकार लग्नासाठी हजेरी लावणार आहेत.

Pramod Yadav

Rakul Preet Singh-Jackky Bhagnani Wedding

बॉलीवूडची अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि अभिनेता व निर्माता जॅकी भगनानी यांचे 21 फेब्रुवारी 2024 रोजी गोव्यात लग्न होत आहे. गोव्यातील आयटीसी ग्रँड हॉटेलमध्ये दोघांचा ग्रँड विवाह होणार आहे. यासाठी बॉलिवूडमधून अनेक कलाकार गोव्यात दाखल व्हायला सुरुवात झाली आहे.

रकुल आणि जॅकीचे लग्न अतिशय खासगी ठेवण्यात आले असले तरी काही मोजके कलाकार लग्नासाठी हजेरी लावणार आहेत.

रकुल-जॅकीचे लग्न एक दिवसावर येऊन ठेपल्याने बीटाऊन मधून कलाकार गोव्यात दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. यात शिल्पा शेट्टी कुंद्रा, आयुष्यमान खुराणा, वरुन धवन कलाकार गोव्यात दाखल झाले आहेत.

शिल्पा शेट्टी कुंद्रा पती राज कुंद्रासह मुंबई विमानतळावर दिसून आले. दोघेही काही तासांपूर्वीच गोव्यात दाखल झाले आहेत. याच व्हिडिओ देखील समोर आला आहे.

शिल्पा आणि राज कुंद्रा यांचा गोव्याला जाण्यापूर्वीचा दोघांचा मुंबई विमानतळावरील व्हिडिओ समोर आला आहे.

बॉलीवूडचा आघाडीचा अभिनेता आयुष्यमान खुराणा आणि त्याची पत्नी देखील रकुल- जॅकीच्या लग्नाला हजेरी लावणार आहेत. दोघेही गोव्याला जाण्यापूर्वी मुंबईच्या विमानतळावर दिसून आले.

रकुल-जॅकी 21 फेब्रुवारी रोजी गोव्यात लग्नगाठ बांधणार आहेत, यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. दोघांच्या लग्नाची थीम इकोफ्रेन्डली असून, यासाठी अनेक महत्वाच्या बाबींचा विचार करण्यात आला आहे.

लग्नासाठी मर्यादीत आणि जवळच्या लोकांनाच आमंत्रण देण्यात आले असून, लग्नस्थळी मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT