Rakul Preet Singh-Jackky Bhagnani Wedding Dainik Gomantak
गोवा

Rakul Preet Singh-Jackky Bhagnani Wedding: रकुल-जॅकी दोन रितीरिवाजानुसार करणार लग्न, किती वाजता घेणार सात फेरे?

Rakul Preet Singh-Jackky Bhagnani wedding: रकुल-जॅकीच्या शाही लग्नात सहभागी होण्यासाठी बॉलिवूडचे अनेक स्टार्स गोव्यात दाखल झाले आहेत.

Pramod Yadav

Rakul Preet Singh-Jackky Bhagnani wedding

बी टाऊनचे लोकप्रिय जोडपे रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी आज (बुधवारी) गोव्यात लग्न करणार आहेत. गोव्यातील रॉयल हॉटेलमध्ये हे जोडपे सात फेरे घेतील.

या शाही लग्नात सहभागी होण्यासाठी बॉलिवूडचे अनेक स्टार्स गोव्यात दाखल झाले आहेत. विविध माध्यमांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, रकुल आणि जॅकी एक नव्हे तर दोन रितीरिवाजानुसार लग्न करणार असल्याची चर्चा आहे.

हिंदुस्तान टाईम्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी पंजाबी आणि सिंधी रितीरिवाजानुसार लग्न करणार आहेत. रकुल पंजाबी आहे तर, जॅकी हा सिंधी कुटुंबातील आहे.

रकुल - जॅकी 'आनंद कारज' (पंजाबी रितीरिवाज) आणि सिंधी अशा दोन्ही रितीरिवाजानुसार लग्न करणार आहेत. लग्नानंतर उपस्थित पाहुण्यांसाठी आफ्टर पार्टीचे आयोजन करण्यात येणार आहे.

रकुल आणि जॅकी यांच्या लग्नासाठी त्यांच्या कुटुंबाव्यतिरिक्त बी टाऊन सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे.

वधू रकुलचा चुडा समारंभ बुधवारी (दि.21) सकाळी होणार असून, जोडपे दुपारी 3.30 नंतर सात फेरे घेतील.

रकुल आणि जॅकीचा लग्न समारंभ पूर्णपणे खाजगी ठेवाला जाणार आहे. दोघांच्या लग्नाचे खास फोटो ते स्वतः शेअर करणार आहेत. त्यामुळे अतिथींना लग्नस्थळी फोन वापरण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

October 2026 Rules Change: 1 ऑक्टोबरपासून बदलणार 9 मोठे नियम! खिशाला लागणार कात्री, महागाई आणि बचतीवर होणार परिणाम; सणासुदीच्या तोंडावर आर्थिक झटका

Asian Games 2026: तिरंदाजीत भारताची 'गोल्ड' हॅटट्रिक! पुरुष कंपाउंड संघाने मिळवला रोमांचक विजय; फायनलमध्ये चीनला दिली मात

Kharif Sowing Area Decline: पेरणीखालील क्षेत्र घटले, तरी खरीप उत्पादनाला फटका नाही; रब्बीसाठी केंद्राचे 177.72 दशलक्ष टनांचे लक्ष्य

Lucky Zodiac Signs: राहू-केतूची उलटी चाल ठरणार वरदान! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुख, संपत्ती आणि समृद्धी; मिळणार बक्कळ पैसा

Goa Water Crisis: राज्य गंभीर पाणी संकटाच्या दिशेने; सत्तरीतील नद्या सप्टेंबरमध्येच तळाला, 31 टक्के पावसाची तूट

SCROLL FOR NEXT