Rakul Jackky Sangeet Ceremony Started. Many Celeb Attended The Special Occasion | Dainik Gomantak Dainik Gomantak
गोवा

Rakul Jackky Sangeet Ceremony Video: गोव्यात रकुल - जॅकीच्या संगीत समारंभाला सुरुवात, सिने कलाकारांची हजेरी

[Watch] Rakul Jackky Sangeet Ceremony Video:रकुल - जॅकीच्या संगीत समारंभात बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध कलाकार सहभागी झाले आहेत. याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.

Pramod Yadav

Rakul Preet Singh and Jackky Bhagnani sangeet ceremony in Goa

अभिनेत्री रकुल प्रीत सिंग अभिनेता-चित्रपट निर्माता जॅकी भगनानीसोबत बुधवारी गोव्यात लग्नगाठ बांधणार आहे. समुद्रकिनारी असलेल्या ग्रँड हॉटेलमध्ये हा लग्न समारंभ होणार असून, लग्नापूर्वीच्या संगीत समारंभाला सुरुवात झाली आहे.

रकुल - जॅकीच्या संगीत समारंभात बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध कलाकार सहभागी झाले आहेत. याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.

रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानीच्या लग्नासाठी सिने कलाकारांसह दोघांचे पालक देखील आणि नातेवाईक देखील गोव्यात दाखल झाले आहेत.

रकुल - जॅकीच्या लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांचे व्हिडिओ सध्या समोर आले आहेत. समोर आलेले व्हिडिओत रकुलचे पालक, राजेंद्र सिंग आणि कुलविंदर सिंग उपस्थित होते.

दुसऱ्या एका व्हिडिओत जॅकीचे वडील आणि निर्माता, वाशू भगनानी आणि बहीण, दीपशिखा देशमुख, पापाराझींसाठी पोज देताना दिसले.

जॅकी आणि रकुलच्या लग्नात सहभागी होण्यासाठी अनेक सेलिब्रिटी गोव्यात दाखल झाले आहेत. या लग्नासाठी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा हे सर्वात पहिल्यांदा गोव्यात दाखल झाले.

या पाठोपाठ अर्जुन कपूर आणि ईशा देओल देखील गोव्यात दाखल झाले आहेत.

वरुण धवन देखील पत्नी नताशासोबत या लग्नासाठी गोव्यात दाखल झाला आहे. वरुणने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे असून, यात तो पत्नी नताशासोबत गोवन धाळीचा आस्वाद घेताना दिसत आहे.

रकुल-जॅकीचे लग्न खासगी ठेवले जाणार असून, यासाठी मर्यादीत आणि महत्वाच्या लोकांनाच आमंत्रण देण्यात आले आहे. दोघांच्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी अनेक सिने कलाकार गोव्यात दाखल झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रितेश, जिनेलिया, आदित्य रॉय कपूर, अनन्या पांड्ये, शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, टायगर श्रॉफ, अक्षय कुमार, शाहिद कपूर, भूमी पेडणेकर, इशा देओल, सोनम कपूर हे बॉलीवू़ड कलाकार या सोहळ्यासाठी गोव्यात येणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'वो दबाव नहीं, सम्मान का हकदार है...', रोहितच्या निवृत्तीच्या वृत्ताने माजी क्रिकेटपटू संतापला; गंभीर-अजित टार्गेटवर

Guru Gochar 2026: नक्षत्रांचा राजा आणि देवगुरुंची युती! 'या' 5 राशींच्या आयुष्यात सुरु होणार सोन्यासारखा काळ; व्यवसायात नव्या आयडिया ठरतील सुपरहीट

Sonam Wangchuk Hunger Strike: "मी भूत बनून परत येईन...", सोनम वांगचुक यांचा थेट इशारा; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम

Sohail Khan: 'माझ्यावर लैंगिक अत्याचार झाला, पण भीतीमुळे कुणालाही सांगितलं नाही'; सोहेल खानचा धक्कादायक खुलासा

Goa Monsoon: गोव्यात पावसाचं कमबॅक! सत्तरीतील रस्ते जलमय, मुसळधार सरींमुळे बळीराजा सुखावला

SCROLL FOR NEXT