Rakul-Jackky Wedding Unseen Video Photo Dainik Gomantak
गोवा

Rakul-Jackky Wedding Unseen Video Photo: रकुल-जॅकीच्या लग्नातील इनसाईड फोटो- व्हिडिओ व्हायरल, पाहा शाही लग्नाची झलक

Rakul-Jackky Wedding Unseen Video Photo: जोडप्याच्या लग्नाला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनीही हजेरी लावली ज्यांनी या सोहळ्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Pramod Yadav

Rakul-Jackky Wedding Unseen Video Photo

अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि निर्माता जॅकी भगनानी बुधवारी गोव्यात विवाहबद्ध झाले. दक्षिण गोव्यातील आयटीसी ग्रँड हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा आयोजित करण्यात आला होता.

या जोडप्याच्या लग्नाला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनीही हजेरी लावली ज्यांनी या सोहळ्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये काही लग्नाच्या कार्यक्रमांचीही झलक आहे.

बुधवारी लग्न सोहळा पार पडल्यानंतर दोघांनी सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर केले. रकुल प्रीतने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत - आता तू कायमची माझी आहेस. यासोबतच त्याने लग्नाच्या तारीखेचे (21-02-2024) कॅप्शन दिले आहे.

जॅकी विंटेज कारमधून लग्नानंतरची मिरवणूक काढताना दिसत आहे. या जोडप्याने हॉटेलच्या लॉनमध्ये सात फेरे घेतले. या कार्यक्रमात शिल्पा शेट्टीने पती राज कुंद्रासोबत परफॉर्म केले.

या दोघांशिवाय शाहिद कपूर, भूमी पेडणेकर, अनन्या पांडे आणि आयुष्मान खुराना हे देखील पत्नी ताहिरा कश्यपसोबत दिसले.

शाहिद कपूरचा फंक्शनमधील एक फोटोही सध्या व्हायरल झाला आहे. यामध्ये तो पांढऱ्या पारंपारिक पोशाखात दिसत आहे. शाहिद येथे त्याच्या मित्रांसोबत मस्ती करताना दिसला.

इव्हेंटमध्ये पोहोचलेला अभिनेता मोहित मारवाहची पत्नी अंतरा हिनेही काही फोटो शेअर केले आहेत. कोरिओग्राफर बॉस्को मार्टिसनेही आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

Sanju Samson: आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनची दमदार बॅटिंग, फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

SCROLL FOR NEXT