Rajkot Murder Accused Basappa Arrested in Goa After 35 Years
मडगाव: आपल्या ठेकेदाराचा खून करुन तब्बल 35 वर्षे राजकोट पोलिसांना गुंगारा देणारा बसप्पा हा कावोरा-राय येथे बिनधास्त आपल्या कुटुंबीयांसमवेत राहत होता. त्याच्यावर खूनासारखा गंभीर गुन्ह्याची नोंद असल्याची कुणाला कल्पनाही नव्हती. ज्या दिवशी त्याला पोलिसांनी अटक केली, तेव्हाच तो खूनी असल्याचे येथील लोकांना कळाले.
राजकोट पोलिसांना तो गोव्यात असल्याची पक्की माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तडक मायणा-कुडतरी पोलिसांना सतर्क केले. मायणा-कुडतरी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत बसप्पाला बेड्या ठोकल्या. त्या खून प्रकरणाच्या नाट्यावरही पडदा पडला. बसप्पा हा मूळचा कर्नाटकातील असून, तो राय येथे एका ठिकाणी केअरटेकर म्हणून काम करत होता. 1990 मध्ये दाखल झालेल्या खून खटल्यासंदर्भात त्याला अटक करण्यात आली.
तीन दशकांहून अधिक काळापासून पोलिसांना चकवा देणाऱ्या बसप्पाला बीएनएसएस 2023 च्या कलम 35 अंतर्गत अटक करण्यात आली. पुढील तपास आणि कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला राजकोट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.