Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

राजस्थानी तरुणाला हडफडे येथे अज्ञाताकडून जबर मारहाण; गॅस सिलिंडर अफरातफरीचा केला होता आरोप

Goa Crime News: शोक बिश्नोई याच्याविरोधात याआधी गॅस सिलिंडर अफरातफर प्रकरणात त्याच्या सहकाऱ्यांकडून पोलिस तक्रार दाखल करण्यात आली होती.

गोमंतक ऑनलाईन टीम

कळंगुट: नागवा-हडफडे पंचायत क्षेत्रातील रावतावाडा प्रभागात अज्ञाताकडून अशोक बिश्नोई (३५, राजस्थान) या राजस्थानी तरुणास जबर मारहाण करण्यात आली असून याबाबतीत हणजूण पोलिसांत रितसर तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हणजूण पोलिस स्थानकाचे निरीक्षक सूरज गावस पोलिस पुढील तपास करीत आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मारहाण करण्यात आलेला अशोक बिश्नोई हा राजस्थानी तरुण गॅस सिलिंडर टेक्निशियन म्हणून काम पाहत होता.

मंगळवारी रात्री उशिरा बिश्नोई राहत असलेल्या नागवा-हडफडे येथील त्याच्या भाडोत्री रुमवर एकूण सात तरुणांनी पूर्ववैमनस्यातून हल्ला केल्याची तक्रार हणजूण पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.

या हल्ल्यात एकूण सात हल्लेखोर सहभागी होते. पैकी तीन तरुण स्थानिक असल्याचा दावा अशोक बिश्नोई याने प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे.

दरम्यान, अशोक बिश्नोई याच्याविरोधात याआधी गॅस सिलिंडर अफरातफर प्रकरणात त्याच्या सहकाऱ्यांकडून पोलिस तक्रार दाखल करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'आरजी'मधील घडामोडी गोव्यातील परंपरेला धरूनच

पंधरा वर्षांनंतर राजकारणाचे एक वर्तुळ पूर्ण!

Goa Air India: गोव्याकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या फेऱ्यांत कपात; पावसाळी पर्यटनावर होणार परिणाम, इंधनदर वाढीचा फटका

Viral Video: विमानाची टक्कर झाली अन् हवेतच पॅराशूट फाटला... मृत्यूच्या दाढेतून 44 वर्षांची महिला थोडक्यात वाचली; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

Goa Fraud Cases: गोव्यातून थेट दुबईत ठोकली धूम! तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंडचा पोलिसांना चकमा; लुकआऊट नोटीस जारी

SCROLL FOR NEXT