Rain News  Dainik Gomantak
गोवा

पुढील दोन ते तीन दिवसात उत्तर आणि दक्षिण गोव्यात पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली शक्यता

दैनिक गोमन्तक

गेले काही दिवस पणजीसह गोव्यातील संपुर्ण भागात ढगाळ वातावरण असुन दोन दिवसांपुर्वी पणजीसह परिसरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या होत्या. तसेच 14, 15, 16 आणि 17 मे रोजी उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

यंदा मॉन्‍सूनचे आगमन लवकरच

गोव्‍यात यंदा मॉन्‍सूनचे लवकर आगमन होऊ शकते, अशी माहिती भारतीय हवामान खात्‍याने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. केरळमध्ये यंदा मॉन्‍सून 27 मे रोजी दाखल होण्याची शक्‍यता आहे. केरळमध्ये पाऊस दाखल झाल्‍यानंतर अंदाजे 7 दिवसांनी गोव्‍यात मॉन्‍सून दाखल होतो. या पार्श्‍वभूमीवर राज्यात यावर्षी मॉन्‍सून दि. 2 जून रोजी दाखल होऊ शकतो, असेही वेधशाळेने म्‍हटले आहे.

हवामानशास्त्र विभागाने गुरुवारी (ता. १२) दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात मॉन्सून दाखल होण्यासाठी हवामान पोषक झाले आहे. त्यामुळे रविवारपर्यंत (ता. 15) दक्षिण अंदमान समुद्र आणि लगतच्या उपसागरात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानुसार यंदा मॉन्सून 27 मे रोजी केरळमध्ये दाखल होऊ शकतो. सांख्यिकीय मॉडेलच्या माध्यमातून हा अंदाज जाहीर करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

SCROLL FOR NEXT