Rain with lightning keeps fire, power personnel busy  Dainik Gomantak
गोवा

वादळी वाऱ्याचा फोंड्यात फटका, तर कुडणेत घरावर कोसळली वीज

संबंधितांना मिळणार नुकसान भरपाई

दैनिक गोमन्तक

फोंडा : अवकाळी पावसाने सबंध राज्याला भंडावून सोडले असून वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत असल्याने पडझड सुरूच आहे. फोंडा तालुक्यात तर ही पडझड सुरूच असून अनेक ठिकाणी झाडे जमीनदोस्त होण्याबरोबरच वीज खांबही मोडून पडत आहेत. काल (गुरुवारी) संध्याकाळी झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे शिरोडा, तळावली तसेच अन्य काही भागात झाडे कोसळली. दोन घरांचे त्यामुळे नुकसान झाले. दरम्यान, कुडणे येथील गोकुळदास अनंत मळीक यांच्या घरावर काल रात्री वीज कोसळली. यात फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन, गिझरसह सुमारे चार लाखांचे साहित्य खाक झाले आहे. (Rain with lightning keeps fire, power personnel busy)

संध्याकाळी अचानकपणे वादळी वारा आणि विजा चमकून पाऊस सुरू झाला. या वादळी वाऱ्याच्या पावसामुळे लोकांची धांदल उडाली. कामावरून घरी परतणाऱ्या लोकांना तर अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.

शिरोडा भागात आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या मागे असलेल्या एका घरावर झाड कोसळल्याने नुकसान झाले तर तळावली भागात मंदिराच्या मागे असलेल्या घरावर झाड कोसळल्याने या घराचेही नुकसान झाले. काल संध्याकाळी अग्निशामक दलाला नऊ कॉल्स आले. मात्र सर्वाधिक हानी वाळपई भागात झाली.

वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी वीज खांब उन्मळून पडले तर वीजवाहिन्या तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला. आंबा, फणस, केळी, पोफळीची झाडे काही ठिकाणी जमीनदोस्त झाली. उशिरा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. दरम्यान, कृषीमंत्री रवी नाईक यांनी वादळी वारा आणि पाऊस यामुळे हानी झालेल्या भागाची पाहणी करून नुकसानीचा आकडा निश्‍चित करण्याचे आदेश कृषी अधिकाऱ्यांना दिले असल्याचे सांगितले. मोठ्या झाडांसह पीक देणाऱी छोटी झाडे, किमती फुलझाडांची नुकसानीही स्पष्ट करण्याचे आदेश दिले असून संबंधितांना नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'मॅन ऑफ द मोमेंट'! ईशान किशनचा मोठा शॉट फसला, मार्को यान्सननं बाऊंड्री लाईनवर घेतला भन्नाट कॅच; चाहतेही अवाक

सोन्याच्या किमतीत तेजीचं 'महावादळ', दीड लाखांचा टप्पा फत्ते! गुंतवणूकदारांची चांदी, तर सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री

Horoscope April 2026: एप्रिल महिना 'या' राशीसाठी ठरणार 'लकी'! अविवाहितांसाठी सनई-चौघड्यांचे शुभ संकेत; जाणून घ्या ग्रहांची बदलती स्थिती

IPL 2026: "वैभव सूर्यवंशीच्या वादळासमोर प्रतिस्पर्धी ढेर, राजस्थान फायनलमध्ये जाणारच", दिग्गजाची मोठी भविष्यवाणी

IPL 2026 Points Table: मुंबई-चेन्नई तळाला! पॉइंट्स टेबलमध्ये राजस्थानचा दबदबा, आरसीबी बॅकफूटवर; पंजाब किंग्सच्या गोटात आनंदाचं वातावरण

SCROLL FOR NEXT