Railway|Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa Railway Corruption: मडगावात लाखोंच्या रेल्वे तिकिटांचा काळाबाजार

संशयित बनावट ओळखपत्रे तयार करुन तिकिटे मिळवत आणि अतिरिक्त रक्कम घेऊन प्रवाशांना विक्री करत होते.

दैनिक गोमन्तक

Goa Railway Corruption: रेल्वे सुरक्षा पोलिस दलाने तिकिटांचा काळाबाजार केल्याप्रकरणी काल मडगाव येथील ईएसआय हॉस्पिटल जवळील फातिमा टूर्स अँड ट्रॅव्हल्स दुकानावर छापेमारी केली.

या कारवाईत पोलिसांनी लाखो रुपयांची रेल्वे तिकिटे, 62 बनावट ओळखपत्रांसह कागदपत्रे जप्त केली आहेत. या प्रकरणी आस्थापन मालक तजुद्दीन कादर (32) याच्यासह हंसराज म. वाघेला (20) याला अटक झाली आहे.

अनेक महिन्यांपासून रेल्वे सिस्टमवरून तिकिट लगेच संपत असल्याच्या तक्रारी होत्या. दरम्यान, संबधित अधिकांऱ्यांना रेल्वे तिकिटांचा काळाबाजार होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

यावरून ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी 62 बनावट ओळखपत्रे जप्त केली आहेत. या ओळखपत्रांच्या माध्यमातून रेल्वे तिकिट बुकिंग केले जात होते.

पार्किंग शुल्काचे काय?

कारवाईत लाखो रुपयांची रेल्वे तिकिटे जप्त करण्यात आली. संशयित हे बनावट ओळखपत्रे तयार करुन तिकिटे मिळवत आणि अतिरिक्त रक्कम घेऊन प्रवाशांना विक्री करत होते.

यातील काही तिकिटांवरून प्रवास व्हायचा आहे, ती तिकिटे ब्लॉक करण्यात येतील, असे रेल्वे सुरक्षा पोलिस दलाचे पोलिस निरिक्षक विनोद मिश्रा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT