Railway Double Tracking  Dainik Gomantak
गोवा

आमचा कायदेशीर लढा सुरूच राहणार : याचिकादार फुर्तादो

रेल्वे दुपदरीकरण निर्णयावर नाउमेद नाही

दैनिक गोमन्तक

मडगाव : रेल्वे मार्ग दुपदरीकरणाच्या कामाला स्थगिती द्यावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका जरी फेटाळून लावली असली तरी आम्ही नाउमेद झालेलो नाही. या प्रकल्पा विरोधात आमची न्यायालयीन लढाई व यापुढेही चालू राहील, अशी प्रतिक्रिया याचिकादार फ्रेडी फुर्तादो यांनी ‘गोमन्तक’ कडे व्यक्त केली.

आम्ही निवाड्यासाठी थांबलो आहोत. तो वाचल्यावर आम्ही पुढचा निर्णय घेऊ. गरज पडल्यास सर्वोच्च न्यायालयात जाण्याचाही मार्ग आम्ही खुला ठेवला आहे, असेही फुर्तादो म्हणाले. हे दुपदरीकरण तमाम गोवेकरावर अन्याय करणारे आहे.

ते फक्त कोळसा माफियांसाठी केले जात आहे आणि ते पूर्ण झाल्यास गोव्याचे पर्यावरण नष्ट होणार ही आमची प्रामाणिक भूमिका आहे. या विस्ताराला विरोध करण्यासाठी न्यायालया बरोबरच आमची रस्त्यावरील लढाईही चालू राहील असे त्यांनी सांगितले.

याचिका पर्यावरणीय मुद्द्यावर आधारित होती आणि न्यायालयात आम्ही ती प्रभावीपणे मांडली आहे, याची मला खात्री आहे. त्यामुळे या निवाड्याला सर्वोच्च न्यायालय आमची बाजू उचलून धरेल, अशी आम्हाला आशा आहे.

या याचिकेत चांदर पंचायतीची बाजू मांडणारे ॲड. बायरन रॉड्रिग्स यांनी पंचायत क्षेत्रात काय काम चालले त्याची आधी पंचायतीला माहिती द्यावी अशी आमची मागणी होती.

-अभिजित प्रभुदेसाई, निमंत्रक, गोयांत कोळसो नाका

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT