Railway News Updates Dainik Gomantak
गोवा

Railway Double Tracking : गोव्यातील दुहेरी रेल्वेमार्गाला मिळाला हायकोर्टाचा ग्रीन सिग्नल

गिरदोली-चांदर स्थानिकांची याचिका न्यायालयाने फेटाळली

दैनिक गोमन्तक

Railway Double Tracking : गिरदोली-चांदर या परिसरातून जाणाऱ्या केंद्र सरकारच्या दुहेरी रेल्वेमार्ग प्रकल्पाच्या कामाविरोधात स्थानिकांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी आज बुधवारी पूर्ण होऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने फेटाळली.

केंद्र सरकारच्या या जनहित प्रकल्पाला राज्य सरकारच्या विविध खात्यांच्या परवानगीची आवश्‍यकता नाही असा युक्तिवाद ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी केला होता. तो खंडपीठाने उचलून धरला आहे असे या निर्णयातून स्पष्ट होते. या निर्णयामुळे दुहेरी रेल्वेमार्ग, वीज तन्मार प्रकल्प व महामार्गाचे रुंदीकरण या तीन रेखीय प्रकल्पांना आव्हान दिलेल्या याचिकांचे धोक्यात आले आहे.

राज्य सरकारचा युक्तिवाद काय?

रेल्वेच्या प्रकल्पासाठी रेल्वे कायद्यातील कलम 11 नुसार पंचायत, शहर व नगर विकास तसेच सीआरझेड प्राधिकरणाच्या परवान्यांची आवश्‍यकता नाही. 1992 साली राज्यात कोकण रेल्वे विरोधात याचिका सादर केली होती. या निवाड्यात रेल्वेच्या प्रकल्पांसाठी राज्य सरकारच्या विविध खात्यांची परवान्यांची गरज नाही, असे निरीक्षण केले होते. हा निवाडा खंडपीठासमोर सादर करण्यात आला. यावर आधारित खंडपीठाने ही याचिका फेटाळली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT