Raid on bar and restaurant in Taleigao arrests youth  Dainik Gomantak
गोवा

67 लाखांचे अमली पदार्थ जप्त, ताळगावातील तरुणाला अटक

बार आणि रेस्टॉरंटवर छापा, तरुणाला अटक

दैनिक गोमन्तक

ड्रग्सविरोधी पथकाने मोलेभाट-साळगाव येथील वाघ बार आणि रेस्टॉरंटवर छापा टाकून संडे ओनी लकी (47, मूळ‌ नायजेरिया सध्या रा. ताळगाव) या संशयिताकडून सुमारे 67 लाखांचे एमडीएमए आणि एलएसडी लिक्विड हे अमली पदार्थ जप्त केले आहे. तसेच संशयिताला अटक केली आहे.

पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी (police) घटनास्थळी धाव घेत छापा टाकला असता, त्यांनी घटनास्थळावरुन एमडीएमए आणि एलएसडी लिक्विड नावाचे अमली पदार्थ (Drugs) जप्त केले आहेत. याची सध्या मार्केटमध्ये 67 लाख रुपये एवढी किंमत आहे. हे अमली पदार्थ नेमके कुठून आले, आणि याची विक्री कुठ केली जाणार होती याचा तपास पोलिस करत आहेत.

वेर्णा पोलिसांनी केलेल्या कारवाईत गांजा बाळगल्याप्रकरणी झुआरी नगर येथील एका मोकळ्या जागेत आरोपी प्रकाश सेन (वय 37) ओडीशा येथील युवकाला अटक करून त्याच्याकडून एक 1.07 किलोग्रॅम गांजा जप्त केला. त्याची किंमत 1 लाख 10 हजार रुपये एवढी होते.

वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार झुआरीनगर येथे एक इसम संशयास्पदरित्या वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार जाऊन संशयिताची झडती घेतली असता त्याच्याकडे निळ्या प्लास्टिक पिशवीत गुंडाळलेला 650 ग्रॅम आणि 457 मिळून 1.107 ग्रॅम गांजा सापडला. नंतर त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक श्रीधर कामत अधिक तपास करीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT