Rahul Gandhi Dainik Gomantak
गोवा

राहुल गांधी या महिनाअखेरीस गोवा दौऱ्यावर!

मात्र तृणमुल कॉंग्रेसमध्ये (Trinamool Congress) फूट पाडण्यासाठी सत्ताधारी पक्षाबरोबर इतर अनेक पक्ष युध्दपातळीवर प्रयत्न करु लागले आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी: देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजू लागलं आहे. यातच आता छोट्याशा गोव्यातही (Goa) विधानसभेच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी अनेक पक्षांचे प्रमुख नेते गोव्यातील जनतेला रिझविण्यासाठी येऊ लागले आहेत. यातच सत्ताधारी भाजपबरोबर (BJP) कॉंग्रेस, महाराष्ट्रवादी गोमन्तक पक्षांसह इतर पक्ष निवडणूकीच्या तयारीला लागले आहेत. तृणमुल कॉंग्रेस गोव्यात दाखल झाल्यापासून राज्यातील राजकारणाला वेगळे वळण लागू लागले आहे. मात्र तृणमुल कॉंग्रेसमध्ये (Trinamool Congress) फूट पाडण्यासाठी सत्ताधारी पक्षाबरोबर इतर अनेक पक्ष युध्दपातळीवर प्रयत्न करु लागले आहेत.

यातच कॉंग्रेसमधूनच फुटून गेलेल्या लुईझिन फालेरो (Luizinho Faleiro) यांनी कॉंग्रेसमधील आपल्या मूळच्या सहकाऱ्यांना तृणमुल पक्षात सामील करुन घेण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे गोव्यात कॉंग्रेसला पुन्हा एकदा खिंडार पडणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी या महिन्याच्या शेवटी गोव्यात दाखल होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. राहुल गांधी गोव्यात दाखल होताच राज्यातील सक्रीय कॉंग्रेस कार्यकर्त्यांची बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये बैठक घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन करत गोवा विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने आपल्या प्रचार सभांचा अघाज करणार आहेत. विशेष म्हणजे राहुल गांधी यांचा हा दौरा राज्यातील कार्यकर्त्यांमध्ये विश्वास भरण्यासाठी असल्याचे सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT