Ragada River Pollution Dainik Gomantak
गोवा

Ragada River Pollution: ‘रगाडा’ नदी प्रदूषणाच्या विळख्यात; अनेकांना थंडी, ॲलर्जी, घशाचा त्रास

Ragada River Pollution: पात्र झाले हिरवेगार : साकोर्डावासीयांत संताप; अनेकांना थंडी, ॲलर्जी, घशाचा त्रास

दैनिक गोमन्तक

Ragada River Pollution

साकोर्डा भागातील रगाडा नदीचे पाणी अचानक दूषित होऊन हिरवेगार झाले आहे. याची माहिती साकोर्डावासीयांना मिळताच संतप्त झालेल्या शकडो लोकांनी आज सकाळी पंचायतीवर धडक दिली.

सरपंच प्रिया खांडेपारकर यांनी त्वरित ग्रामस्थांबरोबर बैठक घेतल्यानंतर प्रदूषित झालेल्या रगाडा नदीच्या पाण्याची देऊळमळ-साकोर्डा येथील पुलाकडे पाहणी केली. नदीचे पाणी आटल्याने ते संथपणे वाहत होते. पात्रातील संपूर्ण पाणी गडद हिरवेगार झालेले दिसत होते.

पानसी जलप्रकल्पातून रगाडा नदीचे दूषित पाणी थेट नळाला सोडले जाते. नळाला गढूळ, हिरव्यागार पाण्याचा पुरवठा होत असून पाण्याला मासळीचा वास सुटला आहे, असे एका महिलेने सांगितले.

हे पाणी प्यायल्याने घशात त्रास होऊ लागलाय. तसेच या भागात सर्दीच्या प्रमाणात वाढ झाली आहेत. डॉक्टरांनी सांगितले की, परिसरातील लोकांनी या पाण्‍यापासून दूर रहावे, अन्‍यथा ॲलर्जी होऊ शकते.

पाण्याचे नमुने पाठविले तपासणीसाठी

आरोग्य खाते, सार्वजनिक बांधकाम खाते व जलस्रोत खात्‍याने पाण्याचे नमुने घेतले असून ते प्रयोगशाळेत पाठविले आहेत. प्रकल्प बंद करून टँकरने गावाला पाणीपुरवठा करण्याची मागणी संतप्त लोकांनी केली आहे. धारबांदोडा पाणी विभागाचे कनिष्ठ अभियंता बाबशेट यावेळी उपस्थित होते. प्रकल्पाला दिलेला ना हरकत दाखला मागे घेणार आहे, असे सरपंच प्रिया खांडेपारकर यांनी सांगितले.

प्रदूषित झालेल्‍या रगाडा नदीबाबत पंचायत मंडळाने आता तरी गांभीर्याने पावले उचलली पाहिजेत. दूषित पाण्यामुळे नागरिकांना अनेक रोग जडण्याची भीती आहे. हा संवेदनशील विषय असून, तो जेव्‍हा पंचायतीकडे आला तेव्‍हाच त्यावर कृती करण्याची गरज होती. पंचायतीने खबरदारी घ्यावी, अन्यथा आम्हाला पुढील कृती करावी लागेल.
- नीलेश मापारी, ग्रामस्‍थ (साकोर्डा)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Vaping Controversy: ''चहलला जेलमध्ये टाका''! ई-सिगरेट प्रकरणावरुन माजी क्रिकेटपटू कडाडले; बीसीसीआयच्या मवाळ भूमिकेवर उपस्थित केला सवाल

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

SCROLL FOR NEXT