Teak Wood Smuggling At Assolda Curchorem Dainik Gomantak
गोवा

Curchorem News: असोल्डा कुडचडे येथे शिश्याचे लाकूड जप्त; केपे वन खात्याची कारवाई

ड्रायव्हर तसेच एक कामगार तेथून पसार झाला

सुशांत कुंकळयेकर

Teak Wood Smuggling At Assolda Curchorem: कुडचडे येथे शिशाच्या लाकडाची तस्करी रोखण्यात केपे वन खात्याच्या अधिकाऱ्यांना यश आले. अधिकाऱ्यांनी सुमारे 5 हजार किमतीचे शिशाच्या लाकडाचे दोन तुकडे जप्त केले. तर सागवान लाकडाची अवैध वाहतूक करणारा ड्रायव्हर तसेच एक कामगार तेथून पसार झाला.

केपे वन खात्याचे वन अधिकारी हरीश सांगोडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी शेल्टन फेर्नांडिस यांनी असोल्डा येथील वखारीत शिशाचे लाकूड कापण्यासाठी आणल्याची माहिती केपे वनखात्याला दिली असता आम्ही त्वरित घटनास्थळी भेट दिली.

याठिकाणी दोन युवक शिशाचे लाकूड वखारीत घेऊन जात असल्याचे दिसून आले. आम्हाला पाहून त्यांनी घटनास्थळावरुन पळ काढल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सदर लाकूड सुमारे पाच हजार रुपयांचे असून आम्ही ते ताब्यात घेतल्याचे सांगोडकर यांनी सांगितले. यावेळी स्थानिक पंच फ्लोरिअन फेर्नांडिस यांनी सदर वाखारीत रोज बेकायदेशीर लाकूड कापण्यासाठी येत असल्याचे सांगितले.

सदर वाखारीवर कडक कारवाई करावी अशी मागणी फेर्नांडिस यांनी केली असून याविषयी आपण स्थानिक आमदार निलेश काब्राल यांच्याशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sri Lanka Vesak Festival Accident: श्रीलंकेत बौद्ध उत्सवादरम्यान भीषण अपघात, मद्यधुंद पिकअप चालकानं गर्दीला चिरडलं; 6 भाविकांचा मृत्यू तर 13 गंभीर जखमी

Bicholim Sports Ground: मोडलेली फाटके अन् कोसळणारे खांब! डिचोलीच्या ऐतिहासिक मैदानाचा खेळखंडोबा; खेळाडू धोक्यात

Gajlakshm Rajyog 2026: कुबेराचा खजिना रिता होणार, रातोरात चमकणार भाग्य! 'गजलक्ष्मी योग' 4 राशींना बनवणार करोडपती; गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम काळ

दक्षिणेतील मोर्चेबांधणी आणि काँग्रेसपुढील आव्हाने

Goa Monsoon: पावसाळापूर्व तयारी केवळ बैठकांपुरतीच

SCROLL FOR NEXT