Quelossim Taxi Drivers Dainik Gomantak
गोवा

Illegal Tour Operators: बेकायदेशीर टूर ऑपरेटर्सवर कारवाई करा! केळशी टॅक्सीचालकांची मागणी

Quelossim Taxi Drivers: केळशी येथील टॅक्सी चालकांनी केळशीचे सरपंच डिक्सन वाझ यांच्यासह कोलवा पोलीस स्थानक गाठून बेकायदेशीर टूर ऑपरेटरवर करवाई करा अशी मागणी केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Illegal Tour Operators

मडगाव: गोव्यात आरटीओ किंवा पर्यटन खाते या दोन्हीकडे स्वतःला नोंद करून न घेतलेले खासगी अनधिकृत टूर ऑपरेटर बेकायदेशररित्या वावरत असून या टूर ऑपरेटर्सवर करवाई करावी, अशी मागणी केळशी येथील टॅक्सीचालकांनी केली आहे.

केळशी येथे एका गाडीला स्थानिक टॅक्सी चालकांकडून अडविण्याचा प्रकार घडला होता. हा टॅक्सी चालक बेकायदेशीर टूर ऑपरेटर कंपनीचा होता, असा दावा स्थानिक टॅक्सी चालकांनी केला होता. याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला होता. स्थानिक टॅक्सी चालक पर्यटकांना सतावत असल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर आज केळशी येथील टॅक्सी चालकांनी केळशीचे सरपंच डिक्सन वाझ यांच्यासह कोलवा पोलीस स्थानक गाठून बेकायदेशीर टूर ऑपरेटरवर करवाई करा, अशी मागणी केली.

ज्या टूर ऑपरेटरची गाडी असल्याचे सांगण्यात आले ती कंपनी हैदराबाद येथे रजिस्टर आहे मात्र त्या कंपनीकडून गोव्यात बेकायदेशीर व्यवसाय चालू आहे. आधीच गोवा माईल्समुळे स्थानिक टॅक्सी चालकांचा व्यवसाय बुडत चालला आहे, त्यात आता अशा बेकायदेशीर कंपन्या येथे पर्यटक घेऊन जाऊ लागले तर स्थानिकांनी व्यवसाय कसा करावा असा प्रश्र्न केळशीचे सरपंच वाझ यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT