प्रधान मुख्य अभियंता पार्सेकर daianik gomantak
गोवा

Panaji News : पीडब्ल्यूडीच्या विविध सेवा ऑनलाईन

प्रधान मुख्य अभियंता पार्सेकर : झुआरी पूल सप्टेंबरपर्यंत पूर्ण

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News : सार्वजनिक बांधकाम खात्याने विविध प्रकारच्या सेवेसाठी खात्याचे संकेतस्थळ तसेच ॲप उपलब्ध करून ऑनलाईन सेवा सुरू केल्या आहेत. ‘आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा’ या उपक्रमातून लोकांना या सेवा देण्यात येत आहेत, त्यांचा लाभ घ्यावा.

झुआरी पुलाचे केबल स्टेडचे काम बाकी असून इतर काम पूर्ण झालेले आहे. त्यामुळे हा पूल येत्या सप्टेंबरपर्यंत वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे, असे मत खात्याचे प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर यांनी व्यक्त केले.

पार्सेकर म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘आत्मनिर्भर भारत स्वंयपूर्ण गोवा’ या उपक्रमांतर्गत लोकांना साधनसुविधा अधिक सुटसुटीत देण्याचे ठरवले आहे. त्याचाच भाग म्हणून या खात्यातर्फे नळ जोडणी, सांडपाणी वाहिनी जोडणीसाठी, रस्ता कापण्यासाठीचे अर्ज ऑनलाईनद्वारे सादर करणे शक्य होणार आहे.

राज्यातील खड्डे बुजवण्याचे काम जेट पॅचरमार्फत सुरू आहे. दिवसागणिक सुमारे ३५०० चौ. मी. खड्डे बुजवण्याची या यंत्राची क्षमता आहे. सध्या खात्याकडे ७ जेटपॅचर आहेत त्यापैकी ३ दक्षिणेत तर ४ उत्तर गोव्यात आहेत.

राज्यात अनेक ठिकाणी पोर्तुगीजकालीन जलवाहिन्या आहेत. त्या बदलण्यासाठीचे कामही सुरू आहे. काही सुलभ शौचालयांचा गैरवापर केला गेला आहे.

त्याचा वापर न करता त्यामध्ये इतर सामान साठवून ठेवले जात असल्याचे उघडकीस आले आहे. पावसाळ्यापूर्वी राज्यातील खोदलेले रस्ते दुरुस्त करण्यात येतील, अशी माहिती पार्सेकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT