Francis Sardin  Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: आपापसातील मतभेद बाजूला ठेवले तर पुढील सरकार काँग्रेसचे; फ्रान्‍सिस सार्दिन...

सावर्डे ग्रामपंचायत सभागृहात आयोजित सावर्डे काँग्रेस गटाच्‍या दुसऱ्या बैठकीत सार्दिन बोलत होते.

दैनिक गोमन्तक

Francis Sardin: आज देशात व राज्‍यात भाजप सरकारच्‍या काळात काय चालले आहे हे सर्वांना माहीत आहे. त्‍याबद्दल मला वेगळे सांगण्याची गरज नाही. या सरकारच्‍या जाचातून जनतेला सोडविण्‍यासाठी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येणे आवश्यक आहे.

आपापसातील मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी कार्य केले तर काँग्रेसचे सरकार निश्‍चितच सत्तेवर येऊन सामान्य लोकांचा विकास होईल, असा विश्‍‍वास खासदार दक्षिण गोवा खासदार फ्रान्‍सिस सार्दिन यांनी व्‍यक्त केला.

सावर्डे ग्रामपंचायत सभागृहात आयोजित सावर्डे काँग्रेस गटाच्‍या दुसऱ्या बैठकीत सार्दिन बोलत होते. यावेळी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे सहसचिव एव्हर्सन वालेस व सहसचिव कॅप्टन विरियातो फर्नांडिस,

खजिनदार ओर्विल रॉड्रिगीस, सावर्डे गटाध्यक्ष जयेश पाटील, गोवा प्रदेश काँग्रेस समिती सदस्य गौतम भंडारी, मनोहर नाईक, सावर्डे अल्‍पसंख्‍याक गटाचे अध्यक्ष दस्तगीर, सावर्डे यूथ काँग्रेसचे सचिव संकेत भंडारी यांची उपस्‍थिती होती.

मनोहर नाईक व गौतम भंडारी यांनी उपस्थितांना सरकारी योजनांचा लाभ कसा घ्‍यावा व पक्षाची कार्यपद्धती या विषयांवर मार्गदर्शन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

SCROLL FOR NEXT