Goa Governor Pusapati Ashok Gajapathi Raju Dainik Gomantak
गोवा

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

Goa Governor Pusapati Ashok Gajapathi Raju: नवा दरबार सभागृहात आज खचाखच गर्दी होती. मूळ आंध्रातील पण गोव्यात स्थायिक झालेल्या आंध्रवासीयांनी आज मुद्दाम वेळ काढून समारंभाला हजेरी लावली होती.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून माजी केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री पुसापती अशोक गजपती राजू यांनी शनिवारी (२६ जुलै) शपथ घेतली. राजभवनातील नव्या दरबार सभागृहात शपथबद्ध होणारे ते पहिले राज्यपाल ठरले. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक अराधे यांनी राज्यपालांना शपथ दिली. त्यांनी इंग्रजीतून ही शपथ घेतली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय नागरी वाहतूकमंत्री के. राजमोहन नायडू, त्यांचे मंत्रिमंडळातील सदस्य, आमदार, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सुलक्षणा यांच्यासह अनेकजण या सोहळ्याला उपस्थित होते.

खरे तर शपथ ही मिनिटभरात घेतली जाते. त्याआधी नियुक्तीचा आदेश वाचला जातो. त्यानंतर नोंदवहीत सह्या केल्या जातात. हे सारे पाचेक मिनिटांत आटोपते; पण राज्यपाल हे घटनात्मक पद असल्याने शिष्टाचारानुसार सारे चालते.

राज्यपालांचे नव्या दरबार सभागृहात शपथविधीला दोन मिनिटे असताना आगमन झाले. त्याआधी मुख्य न्यायमूर्ती आले होते. मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदवेलू यांनी राष्ट्रपतींनी जारी केलेला राज्यपाल नियुक्तीचा आदेश वाचून दाखवल्यानंतर कार्यक्रमास सुरवात झाली. नव्या राज्यपालांनी दाक्षिणात्य उच्चारात इंग्रजीतून शपथ घेतली.

शपथविधी सोहळ्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. कार्यक्रमात सहभागी प्रत्येकाकडून त्यांनी शुभेच्छा स्वीकारल्या. आंध्रातून आलेल्या अनेकांनी तेथील पद्धतीनुसार शाली आणल्या होत्या. त्यापैकी काहींनी मुख्यमंत्र्यांनाही शाली घातल्या

आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

नवा दरबार सभागृहात आज खचाखच गर्दी होती. मूळ आंध्रातील पण गोव्यात स्थायिक झालेल्या आंध्रवासीयांनी आज मुद्दाम वेळ काढून समारंभाला हजेरी लावली होती. त्यामुळे बैठकीची सुरवातीच्या काही रांगा सोडल्या तर तेलगूंची संख्या मोठी होती. आपला माणूस राज्यपालपदी पोचला, याचा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद आजच्या दिवशीचे वैशिष्ट्य होते

नातेवाईकांची मांदियाळी

राज्यपालांचे काल (शुक्रवारी) पत्नी, दोन मुली, बहीण यांच्यासह राज्यात आगमन झाले होते. त्यांच्यासोबत विजयनगर येथून बरीच मंडळी शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहण्यासाठी आली आहे. काल रात्री १० वाजेपर्यंत त्यांचे येणे सुरूच होते. त्यामुळे जुन्या दरबार सभागृहात ही गर्दी मावणार नाही याचा अंदाज प्रशासनाला आला होता. त्यामुळेच नव्या दरबार सभागृहात शपथविधी सोहळ्याची व्यवस्था करण्यात आली होती

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT