Karwar Murder Case Canva
गोवा

Vinayak Naik Murder Case: धक्कादायक! पुणे उद्योजक खून प्रकरणातील गूढ वाढले; संशयित राणेचा मृतदेह सापडला मांडवी नदीत

Pune Businessman Vinayak Naik Death Case: गुरुप्रसाद याने आपल्या कामगारांनाच विनायक याचा खून करण्याची सुपारी दिली होती हे त्या कामगारांना अटक केल्यानंतर पोलिस चौकशीत उघड झाले होते

गोमन्तक डिजिटल टीम

Pune Businessman Vinayak Naik Karwar Murder Case

पणजी: पुणे येथील उद्योजक विनायक नाईक यांचा सुपारी देऊन खून केल्याप्रकरणी कर्नाटक पोलिस गेल्या दोन दिवसांपासून गुरुप्रसाद राणे याच्या शोधात होते. मात्र, आज या प्रकरणाला धक्कादायक कलाटणी मिळाली. आज दुपारी मांडवी नदीत मालीम जेटीजवळ सापडलेला मृतदेह गुरुप्रसाद राणे याचाच असल्याचे त्याच्या पत्नीने ओळख पटविल्याने सिद्ध झाले. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे.

ही माहिती मिळताच कारवार पोलिसांनी पर्वरी पोलिसांशी संपर्क साधला आहे. गुरुप्रसादने आत्महत्या केल्याचा संशय आहे. मात्र, शवचिकित्सा अहवालानंतरच त्याच्या मृत्यूचे कारण कळेल, अशी माहिती पर्वरीच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

गुरुप्रसाद याने आपल्या कामगारांनाच विनायक याचा खून करण्याची सुपारी दिली होती हे त्या कामगारांना अटक केल्यानंतर पोलिस चौकशीत उघड झाले होते. त्यांना अटक झाल्याने गुरुप्रसादने आत्महत्येचा निर्णय घेतला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पर्वरी पोलिसांनी गुरुप्रसाद याची ओळख त्याच्या पत्नीमार्फत पटविल्यानंतर तिची जबानी नोंद केली आहे. प्रथमदर्शनी त्याच्या मृतदेहावर कोणत्याच प्रकाराच्या जखमेच्या खुणा नसल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, आज सकाळी दिवाडी जेटीजवळ एका इसमाचा मृतदेह सापडला. गेल्या अनेक दिवसांपासून सांतइस्तेव कार दुर्घटनेतील बाशुदेव भंडारी हा बेपत्ता असल्याने जुने गोवे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

मात्र, तो मृतदेह त्याचा नसल्याचे उघड झाले. हा मृतदेह कारवार येथील विनायक नाईक खून प्रकरणातील फरारी गुरुप्रसाद राणे याचा असल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. त्याची पत्नी गोव्यातच राहात असल्याने पोलिसांनी तिला ओळख पटविण्यासाठी पाचारण केले. मात्र, तिने तो गुरुप्रसाद राणे नसल्याचे स्पष्ट केले.

त्यानंतर दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास बेती- मालीम जेटी येथे आणखी एक मृतदेह सापडला. त्याच्या पँटमध्ये ओळखपत्रे होती. त्यामध्ये पॅन कार्ड व निवडणूक कार्ड होते. त्यावर गुरुप्रसाद राणे, असे नाव होते.

त्यामुळे पर्वरी पोलिसांनी राणे याच्या पत्नीला बोलावले आणि तिनेही तो मृतदेह गुरुप्रसाद याचाच असल्याचे सांगितले. पर्वरी पोलिसांनी राणे याच्या पत्नीची जबानी नोंद केली. याप्रकरणी प्रथमदर्शनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. राणे याची फोंडा आणि पणजीत अशी दोन घरे आहेत. त्याच्या मडकई आणि शिरोड्यात मद्याच्या कंपन्या आहेत.

मांडवी पुलावर सापडली गाडी

सूत्रधार गुरुप्रसाद राणे हा फोंड्यात राहात असल्याने त्याचा शोध घेत कारवार पोलिस गोव्यात आले होते. तेव्हा त्याची गाडी पणजीच्या दिशेने मांडवी पूल सुरू होतो, त्या ठिकाणी आढळून आली होती. ती पोलिसांनी ताब्यात घेतली होती. त्यामुळे पोलिसांनी या खुनाचे गोवा कनेक्शन असल्याची माहिती कारवार प्रसार माध्यमांना दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT