Goa Public Service Commission  Dainik Gomantak
गोवा

GPSC : 55 अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीची लोकसेवा आयोगाची शिफारस

अकरा विभागीय पदोन्नती समितीच्या बैठका झाल्या

दैनिक गोमन्तक डिजिटल

गोवा लोकसेवा आयोगाने (जीपीएससी) विविध सरकारी विभागातील अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याबाबत विचार करण्यासाठी अकरा विभागीय पदोन्नती समितीच्या बैठका होऊन 55 अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत निर्णय घेण्यात आला.

कृषी संचालनालयातील दोन अधिकाऱ्यांना कृषी उपसंचालक पदावर, तर दोन अधिकाऱ्यांना सहकारी संस्था निबंधक कार्यालयातील विशेष लेखा परीक्षक पदावर बढती देण्यासाठी आयोगाने शिफारस केली आहे.

गोवा नागरी सेवेतील सतरा अधिकाऱ्यांना वरिष्ठ प्रशासकीय श्रेणीत पदोन्नती देण्यात आली. त्यामुळे आता ते राज्य प्रशासनात वरिष्ठ स्तरावर काम करण्यास पात्र असतील. एका अधिकाऱ्याला कौशल्य प्रशिक्षण संचालनालयात उपसंचालक पदावर तर तीन अधिकाऱ्यांना त्याच विभागातील साहाय्यक संचालक पदावर बढती देण्याबाबत निर्णय आयोगाने घेतला आहे.

गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील न्यूरोलॉजीच्या एका प्राध्यापकाच्या पदावर, तर एका अधिकाऱ्याला फार्मास्युटिकल केमिस्टच्या पदावर बढती देण्याची शिफारस करण्यात आली आहे.

महिला व बालविकास संचालनालयातील बालविकास प्रकल्प अधिकारी या पदावर दोन अधिकाऱ्यांनाही बढती देण्याची तसेच शिक्षण विभागातील अकरा आणि सहकार विभागातील तेरा अधिकाऱ्यांसाठी परिविक्षा कालावधी आणि निश्चिती करण्याची शिफारस करण्यात आली आहे. आज झालेल्या या बैठकीत एकूण 55 अधिकाऱ्यांची पदोन्नती तसेच प्रोबेशन उठवणे आणि निश्चिती यासाठी शिफारस करण्यात आली.

सर्व विभागीय पदोन्नती समितीच्या बैठका गोवा लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष जोस मॅन्युएल नोरोन्हा यांच्या अध्यक्षतेखाली झाल्या. या बैठकीला भरती नियमांनुसार मुख्य सचिव आणि प्रशासकीय सचिव समितीचे सदस्य उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ECB New Rules: दारूला पूर्ण बंदी, सोशल मीडियावरही नियंत्रण! क्रिकेटपटूंसाठी बोर्डाचे 6 कडक नियम लागू, शिस्तभंगावर करडी नजर

VIDEO: "मनीषाशीच लग्न लावा, नाहीतर जीव देईन"; तरुणी चढली मोबाईलच्या टॉवरवर, समलैंगिक प्रेमप्रकरणाचा हायव्होल्टेज ड्रामा

Crime News: आईवर डोळा, मुलगा ठरला अडथळा; आठ वेळा जमिनीवर आपटून दीड वर्षांच्या चिमुकल्याची हत्या, आरोपीला फाशीची शिक्षा

Rajpal Yadav Jail: राजपाल यादवच्या अडचणीत वाढ! चेक बाऊन्स प्रकरणात हाय कोर्टाचा दणका, 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा

Goa Crime: सिकेरीत रिसॉर्टजवळ सापडला शाहिद आफ्रिदीचा मृतदेह, कांदोळी समुद्रकिनाऱ्यावरून झाला बेपत्ता

SCROLL FOR NEXT