Ferry Boat Dainik Gomantak
गोवा

Ferry Boat: फेरीसेवा शुल्‍काविरोधात निदर्शने

Ferry Boat: ‘आरजी’चा सहभाग : अधिसूचना रद्द करण्याची मागणी; मंत्र्यांविरोधात घोषणा

दैनिक गोमन्तक

Ferry Boat: दुचाकी व चारचाकी वाहनांच्या फेरीसेवा शुल्कात वाढ करण्याची अधिसूचना रद्द करण्याची मागणी रिव्‍होल्‍युशनरी गोवन्‍स (आरजी) पक्षाने केली आहे. असे शुल्क लादून सर्वसामान्यांना आणखी महागाईच्‍या खाईत लोटणाऱ्या भाजप सरकारच्या हेतूवर पक्षाचे सांतआंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांनी संताप व्‍यक्त केला आहे.

दरम्‍यान, आज शनिवारी ‘आरजी’च्‍या कार्यकर्त्यांनी स्‍थानिक लोकांसह चोडण फेरीधक्क्‍यावर निदर्शन केले. तसेच नदीपरिवहन खात्‍याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांच्याविरोधात घोषणा दिल्या.

आमदार बोरकर म्हणाले की, फेरीसेवा वाढीव शुल्काच्या निषेधार्थ आम्ही चोडण फेरीधक्क्‍यावर एकत्र येऊन निदर्शने केली. व्यावसायिक वाहनांसाठी १०० रुपये आणि मोठ्या वाहनांसाठी ४०० रुपये अस्वीकार्य आहेत. हे शुल्क रद्द करण्याची आमची मागणी आहे.

मये, चोडण, डिचोली आदी भागातील सर्वसामान्य लोक, विद्यार्थी हे चोडण-रायबंदर फेरीसेवेचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. वाढीव शुल्‍कामुळे त्‍यांच्‍यावर अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार आहे. या शुल्काद्वारे महसूल मिळविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

मात्र, भाजप सरकार जनतेला अनेक फायदे मिळवून दिल्याच्या बढाया मारत असताना आता फेरीसेवा शुल्क का आकारत आहे? असा सवाल आमदार बोरकर यांनी उपस्‍थित केला.

  • ५० हजारांहून अधिक लोकांना बसणार फटका

  • ‘आरजी’चे सदस्य अजय खोलकर म्हणाले की, नदीपरिवहन विभागाकडे आधीच

  • ५.५ कोटींचा अतिरिक्त निधी आहे. मग शुल्क आकारण्याची गरज काय?. सरकारने ताबडतोब अधिसूचना रद्द करावी.

  • चोडण येथील आरजीचे नेते करण वळवईकर म्हणाले की, फेरी सेवा वापरण्यासाठी वाहनांच्या शुल्कात वाढ केल्यानंतर मये, डिचोली, दिवाडी, साखळी आदी भागातील

  • ५० हजारांहून अधिक लोकांना फटका बसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT