Protest in Panjim against IIT Goa Sanguem  Dainik Gomantak
गोवा

Goa IIT Protest : आयआयटी नको; सांगेतील शेतकरी राजधानीत धडकले

आझाद मैदानावर सरकारविरोधात घोषणाबाजी करत कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही, असा इशारा दिला.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa IIT Protest : सांगे येथील प्रस्तावित शैक्षणिक आयआयटी प्रकल्‍प आमच्यावर बळजबरीने लादला जात आहे. मात्र, आम्हाला आमची शेती हवी आहे, अशी मागणी करत सांगे तालुक्यातील कोटार्लीसह नागवे येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी राजधानी पणजीत धडक मारली. आझाद मैदानावर सरकारविरोधात घोषणाबाजी करत कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही, असा इशारा दिला.

केंद्र सरकारच्या मानव संसाधन आणि विकास मंत्रालयांतर्गत येणारी अभिमत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गोवा अर्थात आयआयटी गोवा 2014 पासून फर्मागुढी येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या परिसरात सुरू आहे. या आयआयटीला कायमस्वरूपी स्थिर कॅम्पस मिळावा यासाठी राज्य सरकारचे शिक्षण खाते गेल्‍या अनेक दिवसांपासून प्रयत्‍नशील आहे. काणकोण आणि वाळपईतील विरोधानंतर आता आयआयटी सांगे येथे उभारण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. मात्र, स्थानिक शेतकऱ्यांकडून या प्रकल्‍पाला गेल्या अनेक दिवसांपासून विरोध होत आहे.

सरकारचा दावा आहे की ही जमीन सरकारची आहे, तर शेतकऱ्यांच्या मते ही जमीन आमची वडिलोपार्जित कोमुनिदादची असूनती आमचीच आहे. गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक शेतकरी ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत. सरकारने या आंदोलनाला न जुमानता जमिनीचा प्राथमिक सर्व्हे पूर्ण केला आहे.

मंत्री फळदेसाईंची दादागिरी : मास्‍कारेन्‍हस

आयआयटी प्रकल्‍प सांगे येथेच व्हावा यासाठी मंत्री सुभाष फळदेसाई दादागिरी करत आहेत. त्यांच्या दादागिरीला आमचा कायम विरोध असेल आणि ती यापुढे खपवून घेतली जाणार नाही, असे ‘सांगे बचाव’ समितीचे कोन्स्तासिओ मास्‍कारेन्‍हस यांच्यासह शेतकऱ्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT