Goa Tourism | Goa Beach Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: केळशीत समुद्रकिनाऱ्यावर उभारण्यात आलेल्या 'पर्यटन'च्या काऊंटरला विरोध

Goa Tourism: केळशीत निषेधार्थ बोटी पर्यटकांसाठी समुद्रात न उतरता किनाऱ्यावर नांगरुन ठेवल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

गोवा पर्यटन खात्यातर्फे पर्यटकांसाठी त्यांची रांग प्रणाली लागू करण्यासाठी आणि त्यांच्या वतीने शुल्क वसूल करण्यासाठी केळशी समुद्रकिनाऱ्यावर उभारण्यात आलेल्या तिकीट कॉउंटरच्या निषेधार्थ केळशी व सभोवतीच्या जलक्रीडा बोट मालकांनी त्यांच्या बोटी पर्यटकांसाठी समुद्रात न उतरता किनाऱ्यावर नांगरून ठेवल्या आहेत.

दक्षिण गोव्यातील वॉटर स्पोर्ट्स ऑपरेटरप्रमाणे उत्तर गोव्यातील वॉटर स्पोर्ट्स ऑपरेटर्सदेखील राज्यव्यापी आंदोलन पुकारण्याची योजना आखत असून सीआरझेड नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पर्यटन विभागावर कारवाईसाठी राष्ट्रीय हरित लवादाकडे जाण्याच्या तयारीत आहेत.

केळशी मधील जलक्रीडा चालक आणि स्थानिक पंचायतीने काउंटरला विरोध केला होता. कोणतीही परवानगी घेतली नसल्यामुळे ते बेकायदेशीर असल्याचा दावा पंचायतीने केला आहे. जलक्रीडा बोट मालकांनी बोटी समुद्रात न नेता किनाऱ्यावर नांगरून ठेवल्या आहेत.

-रॉय बार्रेटो, जलक्रीडा चालक-

पर्यटन व्यवसाय स्थानिकांकडून काढून घेऊन तो परराज्यातील लोकांच्या हाती देण्याचा सरकारचा डाव आहे,का याचे उत्तर पर्यटन खात्याने द्यावे. आम्हाला विश्वासात न घेता पर्यटन विभागाने उचललेल्या पावलांच्या निषेधार्थ आम्ही अखिल गोवा स्तरावर सर्व जलक्रीडा बोटी बंद करण्याच्या विचारात आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vegetable Price Hike: उष्णतेमुळे बाजारात महागाईचा तडाखा; पणजीसह राज्यात भाज्यांचे दर भडकले, लिंबू-शहाळ्याला मागणी वाढली

NEET Exam: 15 मिनिटे आधीच परीक्षा हॉलमधून बाहेर काढले? पेडण्यातील 'त्या' धक्कादायक घटनेने गोव्यात खळबळ; 'नीट' प्रशासनावर प्रश्नचिन्ह

FIFA World Cup 2026: 18 वर्षांच्या लमीन यमालचा फुटबॉल जगतात धमाका, लिओनेल मेस्सीला सोडले मागे; 96 वर्षांचा इतिहास मोडीत काढत स्पेनने रचला नवा 'कीर्तिमान'

VIDEO: धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्याच्या भावावर जीवघेणा हल्ला, प्रकृती गंभीर; धारदार शस्त्रानं वार करत आरोपी फरार

Valpoi Water Issue: गटारावरील लादीवरही कीड आढळल्याने घबराट! वाळपईत चिंतेचे वातावरण, यापूर्वी पाण्यात आढळलेल्या कीडीशी साम्य

SCROLL FOR NEXT