Old Goa Church Dainik Gomantak
गोवा

Old Goa: जुने गोवे वारसा स्थळात इमारती नकोत! स्थानिकांची भूमिका; प्रस्तावित पोलिस स्थानक इमारतीला विरोध

Old Goa Church Protest: जुने गोवे येथील चर्च ही जागतिक वारसा स्थळात येते. त्यामुळे तिच्या तीनशे मीटरच्या परिघात कोणत्याही प्रकारची दोन-तीन मजली इमारत उभारता येत नाही.

Sameer Panditrao

पणजी: जुने गोवे येथील चर्च ही जागतिक वारसा स्थळात येते. त्यामुळे तिच्या तीनशे मीटरच्या परिघात कोणत्याही प्रकारची दोन-तीन मजली इमारत उभारता येत नाही असे असताना त्या ठिकाणी पोलिस स्थानकांची मोठी इमारत सरकार उभारू इच्छिते.

परंतु त्याला आमचा विरोध असून पोलिस स्थानकाच्या नूतनीकरणाला मात्र आमचा विरोध नसल्याचे जुने गोवा येथील स्थानिक जॅकलीन फर्नांडिस यांनी सांगितले. त्या आझाद मैदान येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

यावेळी इतर स्थानिक ग्रामस्थ देखील उपस्थित होते. दरम्यान फर्नांडिस म्हणाल्या, हे पोलिस स्थानक कुंभारजुवे आणि सांताक्रुज अशा दोन मतदारसंघासाठी आहे. जर मोठे पोलिस स्थानक उभारायचे असेल तर त्यांनी दुसरीकडे उभारावे. वारसा स्थळाच्या ठिकाणी नको कारण येथे जर एखादी मोठी इमारत आली तर अनेक इमारती येत राहणार. आम्हाला जुने गोवे येथे ‘मास्टरप्लॅन’ हवा असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदारांची भेट होईना!

कुभारजुवे मतदारसंघाचे आमदार राजेश फळदेसाई यांनी येथे पोलिस स्थानकाची मोठी इमारत उभारणार असल्याचे म्हटले आहे. परंतु आमचा त्याला विरोध आहे. यासंबंधी आम्ही त्यांना भेटण्याचा अनेकदा प्रयत्न केला, परंतु स्थानिक आमदार यासाठी वेळच देत नसल्याचे विन्सन डिसिल्वा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT