Mumbai Goa Highway Dainik Gomantak
गोवा

Mumbai Goa Highway: परशुराम घाटातील संरक्षक भिंत कोसळली, मुंबई - गोवा महामार्गावर एकेरी वाहतूक

Mumbai Goa Highway: या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काळजीपूर्वक प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Pramod Yadav

Mumbai Goa Highway

मुंबई- गोवा महामार्गावरील परशुराम घाटात संरक्षक भिंत कोसळली असून, सध्या या मार्गावर एकेरी वाहतूक सुरु ठेवण्यात आली आहे. संरक्षक भिंत कोसळल्याने मुख्य रस्त्याला देखील धोका निर्माण झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे रस्ता खचल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. खेड तालुक्यातील जगबुडी नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडली असून, ती सध्या 5.25 मीटर एवढी झाली आहे.

तर, परशुराम घाटातील सुमारे दीड किलोमीटर लांब असणारी संरक्षक भिंत कोसळल्याने मुंबई-गोवा मुख्य महामार्गाला धोका निर्माण झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मार्गावर सध्या एकेरी वाहतूक सुरु ठेवण्यात आली आहे.

या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काळजीपूर्वक प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून गोव्यासह कोकणात मुसळधार पावसाची नोंद होत आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना समोर येत आहेत.

पावसाळ्यात वर्षा पर्यटनासाठी कोकणात जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. याच काळात अनेक नैसर्गिक दुर्घटना देखील घडत असतात. त्यामुळे पर्यटकांना याकाळात योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT