Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: वेश्‍याव्यवसायाचा पर्दाफाश; तीन दलालांना अटक तर दोन नेपाळी युवतींची सुटका

नेरूल येथे गेस्ट हाऊसवर छापा

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime नेरूल येथील हॉटेल ‘हॅलो इन अँड समर हिल’ गेस्ट हाऊसवर गुन्हा अन्वेषण विभागाच्या क्राईम ब्रँचने छापा टाकून वेश्‍याव्यवसायात गुंतलेल्‍या तीन दलालांना अटक केली. यावेळी दोन नेपाळी युवतींची सुटका करण्यात आली.

न्यायालयाच्या परवानगीने त्यांची रवानागी महिला सुधारगृहात करण्यात आली आहे. तर, तिघाही संशयितांना पोलिस कोठडी ठोठावण्‍यात आल्‍याची माहिती पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिली.

या प्रकरणातील संशयित दलालांची नावे लाल विशान दास सराई ऊर्फ आदित्य (३७), सूरज धर्मराज शर्मा (२५) व विशालकुमार राठोड (२१) अशी आहेत. हे तिघेही अनुक्रमे गुजरात, आसाम व उत्तर प्रदेश येथील आहेत.

गोव्यात ते वेगवेगळ्या ठिकाणी राहून ग्राहकांना युवती पुरवत होते. त्‍यांच्‍याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक नाथन आल्मेदा यांच्‍या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.

नोकरीच्‍या बहाण्‍याने युवतींना आणले गोव्‍यात

नेरूल येथील एका गेस्‍ट हाऊसमध्‍ये वेश्‍याव्यवसाय चालत असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्‍या आधारे क्राईम ब्रँचचे पोलिस निरीक्षक दत्ताराम राऊत देसाई, निरीक्षटक लक्षी आमोणकर यांच्या पथकाने काल संध्याकाळी हॉटेलवर छापा टाकला.

हॉटेलची झडती घेतली असता वेश्याव्यवसायातील दलालांना ताब्यात घेतले. तसेच त्‍यांनी आणलेला दोन युवतींना महिला पोलिसांनी ताब्यात घेतले.

त्यांच्या जबान्या नोंदविण्यात आल्या. नोकरीच्या बहाण्याने गोव्यात आणून देहविक्री करण्यास दलालांनी भाग पाडल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: घरच्यांनी सून म्हणून नाकारलं, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानचं घात केला; बायकोचा काटा काढणारा नराधम अखेर गजाआड

Viral Video: प्रवाशांची गर्दी अन् चोरट्याचा प्लॅन तयार! दिल्ली मेट्रोमध्ये बिनधास्त चोरी; कॅमेऱ्यात कैद झालेला व्हिडिओ चर्चेत

Saleli Car Fire: सालेलीत कार आगीत जळून भस्‍मसात; 5 लाख रुपयांचे नुकसान; गाडीनं अचानक पेट घेतल्‍यानं खळबळ

Colombia Earthquake: जमीन फाटली अन् इमारती कोसळल्या, डोळ्यांदेखत उडाली दाणादाण! कोलंबियातील भीषण भूकंपात 132 मृत्यू, 1500 हून अधिक घरे उद्ध्वस्त VIDEO

New Head Coach: वर्ल्ड कपच्या तोंडावर मोठा निर्णय; मुख्य प्रशिक्षक बदलला, आता 'या' व्यक्तीवर मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT