Public-Works-Minister-Deepak 
गोवा

महामार्ग विस्‍तारीकरणात पिलार, जुने गोवेतील घरांना धोका टळला

प्रतिनिधी

गोवा वेल्हा - पिलार ते जुनेगोवे या राष्‍ट्रीय महामार्ग विस्‍तारीकरणासंदर्भात प्रादेशिक आराखडा २०२१मध्ये प्रस्ताव असला, तरी लोकांची घरे, वारसा घरे, धार्मिक स्थळे मोडून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार नाही, असे आश्‍वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांच्या लक्षवेधी सूचनेवर विधानसभेत स्पष्ट केले. यामुळे या रस्त्यालगत असलेल्या घरांचा मालकी हक्क असलेल्यांना दिलासा मिळाला आहे.

राष्‍ट्रीय महामार्ग विस्‍तारीकरण रस्‍ता सात ग्रामपंचायतीच्या कक्षेत येतो. यात पिलार, आगशी, नेवरा, मंडूर डोंगरी, आजोशी, करमळी, जुने गोवे ही गावे मोडतात. हा रस्ता २५ मिटर रुंद होणार असल्याची भीती स्थानिकांच्‍या मनात होती. सध्या रस्‍ता ६ ते ८ मीटर आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणामुळे शेकडो लोकांची हक्काची घरे, वारसा घरे, धार्मिक स्थळे आदींना धोका निर्माण झाला होता. हा धोका ओळखून सुरवातीला सेव्ह नेवरा, सेव्ह आजोशी संघटनानी या रुंदीकरणाला विरोध दर्शविणारी चळवळ सुरू केली होती. त्याला चांगला प्रतिसाद लाभत होता. स्थानिक आमदार फ्रान्सिस सिल्वेरा व सेंट लॉरेन्सचे जिल्हा पंचायत सदस्य धाकू मडकईकर यांचाही या रुंदीकरणाला विरोध होता.

ही चळवळ अधिक धारदार होणार असल्याची चिन्हे दिसत असतानाच सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊस्‍कर यांनी ता. २१  जानेवारी रोजी दुपारी पिलार येथे स्थानिक शिष्टमंडळाची भेट घेतली होती. येथील लोकांचा विरोध त्यांच्या निदर्शनांस दिसून आला होता. यात स्वतः आमदार सिल्वेरा, सेव्ह नेवरा समितीचे अध्यक्ष आमीलकर आल्वारीस, नेवरा सरपंच उषा नाईक, शशिकांत सावंत, ॲड. नेहाल कामत, सेंट लॉरेन्सचे माजी सरपंच झेव्हियर ग्रासियस व ग्रामस्थ यांच्‍यासह अन्‍य मंडळीचा यात सहभाग होता. त्यांनी लोकांची समस्या मंत्र्यांपुढे स्पष्ट केली. आता यासंदर्भातील अपेक्षित धोका टळला असल्याने लोकांना दिलासा मिळाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT