Religious Tradition Dainik Gomantak
गोवा

Religious Tradition: मानाच्या श्रीफळाची विधिवत स्थापना

जांबावलीत शिशिरोत्सव : मिरवणुकीत नागरिकांची मोठी उपस्थिती

गोमन्तक डिजिटल टीम

Religious Tradition जांबावलीच्या प्रसिद्ध शिशिरोत्सवाला बुधवारपासून कोंबवा़डा येथील कै. पुरुषोत्तम केणी यांच्या निवासस्थानी पुजलेल्या नारळाने सुरवात झाली. गुरुवारी (ता. ९) हा नारळ वाजत गाजत मडगावहून जांबावलीला नेऊन त्याची विधीवत स्थापना करण्यात आली.

संध्याकाळी 6.30 वाजता केणी यांच्या घराकडून मिरवणुकीला सुरवात झाली. यावेळी मठग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जुन्या न्यायालयीन इमारतीला वळसा घालून ही मिरवणूक श्री दामोदर सालपर्यंत आली व तिथे युवक-युवतिंनी बॅंड वादनाच्या तालात काही काळ नृत्य केले. नंतर मिरवणूक नगरपालिका इमारतीपर्यंत आली व तेथून थेट जाबांवलीला रवाना झाली.

मठग्रामस्थ जांबावलीच्या दिशेने

आजपासून पुढील सात दिवस जाबांवलीत नाटके, नृत्य व संगीताचे कार्यक्रम होतील. दररोज दुपारी व रात्री महाप्रसादाचे आयोजन केले जाईल. त्यामुळे मठग्रामस्थांचे पाय दररोज जांबावलीच्या दिशेने लागलेले असतील. मंगळवारी (ता.14) दुपारी 3.30 वाजता प्रसिद्ध गुलालोत्सव साजरा होणार आहे. त्यात गोव्यातील कानाकोपऱ्यातून हजारो भक्त व भाविक सहभागी होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT