Section 144 at Manohar International Airport Mopa Goa Dainik Gomantak
गोवा

Section 144: मोपा आणि आसपासच्या गावांत जमावबंदीचे आदेश, पाच व पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी

टॅक्सी चालकांच्या संभाव्य आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा बंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

Pramod Yadav

Section 144 in Mopa: मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा आणि आसपासच्या गावांत जमावबंदीचे आदेश उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आले आहेत.

या आदेशाअंतर्गत पाच व पाचपेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. आदेशानुसार, येत्या 31 मार्चपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे. टॅक्सी चालकांच्या संभाव्य आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा बंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

उत्तर गोव्याचे जिल्हा दंडाधिकारी स्नेहा गिते यांनी जारी केलेल्या आदेशानुसार मोपा विमानतळाच्या अखत्यारीतील मोपा, वारखंड, नागझर आणि चांदेल या गावांमध्ये मिरवणुका, बंदुक, लाठ्या आणि इतर शस्त्रे बाळगणे, लाऊडस्पीकरचा वापर, घोषणाबाजी आणि फटाके उडवणे यावर बंदी घालण्यात आली आहे.

कर्तव्य बजावत सार्वजनिक सेवक आणि विवाह किंवा अंत्ययात्रा किंवा पूर्वपरवानगी घेतलेल्या कार्यक्रमांना हे निर्बंध लागू होणार नाहीत असे जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशात म्हटले आहे.

फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) च्या कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश 31 मार्चपर्यंत लागू राहतील, असे आदेशात जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशात म्हटले आहे.

टॅक्सी चालक आणि ग्रामस्थांच्या संभाव्य अंदोलनामुळे विमानतळाच्या कामाकाजावर परिणाम होण्याची शक्यतेची माहिती उत्तर पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना दिली होती. मोपा, वारखंड, नागझर आणि चांदेल या गावांतील लोक आंदोलन करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅक्सी चालक आणि स्थानिकांनी मोपा विमानतळावर अधिकृत टॅक्सी काउंटर देण्याबाबत मागणीसाठी बैठक घेतली होती. याबाबत 24 डिसेंबर 2023 रोजीच्या पत्रात एसपींनी माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

चार्जिंगचे टेन्शन कायमचे संपले! Redmi ने भारतात लॉन्च केले 10,000mAh बॅटरीचे 2 तगडे फोन; जाणून घ्या बजेटमधील किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Robotic Surgery: कमी वेदना, जलद रिकव्हरी! रोबोटिक सर्जरी म्हणजे काय? नॉर्मल ऑपरेशनपेक्षा किती वेगळी? जाणून घ्या वैद्यकीय तज्ज्ञांकडून

SCROLL FOR NEXT