Margao Municipal Council  Dainik Gomantak
गोवा

सोपो गोळा कंत्राटप्रकरणी मडगाव पालिकेची कोंडी

सोपो गोळा करण्यासाठी मागविलेल्या बोलीप्रकरणात मडगाव नगरपालिकेची सध्या कोंडी झाली असून त्यातून आता पालिका कसा मार्ग काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव : सोपो गोळा करण्यासाठी मागविलेल्या बोलीप्रकरणात मडगाव नगरपालिकेची सध्या कोंडी झाली असून त्यातून आता पालिका कसा मार्ग काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पालिकेने यापूर्वी सोपो गोळा करण्‍यासाठी निविदा मागविली असता, एकच निविदा आली.

पालिका संचालनालयाच्या नव्या नियमानुसार कोणताही निर्णय न घेता ती निविदा पालिका संचालकांकडे पाठवून दिली गेली. पण त्यांनी कोणतेही मतप्रदर्शन न करता ती परत पाठविली व त्यामुळे आता पालिका मंडळालाच त्याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. मुख्याधिकारी रोहित कदम यांनी सांगितले की, हा प्रस्ताव पालिका मंडळासमोर निर्णयासाठी ठेवला जाईल.

सध्या सोपो पालिकेकडून गोळा केला जात असला तरी त्याचे प्रमाण प्रचंड घटल्याने पालिकेच्या महसुलावर परिणाम झालेला आहे. म्हणून आलेली निविदा स्वीकारणे वा गत सोपो ठेकेदाराला तीन महिने ते काम देऊन पुन्हा निविदा मागविणे तसेच त्यातील तीन वर्षे अनुभवाची अट कमी करणे हे पर्याय पालिकेसमोर आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT